विकली एक्सपायरीच्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा प्रभाव होता, ज्यामुळे शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 108 अंकांनी घसरला. ऑटो, बँकींगसह कंझ्युमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर दुसरीकडे मेटल, पॉवर, आयटी, तेल-गॅसच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली, ज्याचा सपोर्ट मिळाला. तर मिडकॅप. स्मॉल कॅप शेअर्समध्येही गुरुवारी विक्रीचा प्रभाव दिसून आला.
निफ्टीच्या 50 पैकी 32 शेअर्समध्ये विक्री दिसून आली. तर सेन्सेक्सच्या 30 पैकी 20 शेअर्समध्ये विक्री, तर निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये विक्री झाली. विकली एस्पायरीच्या शेवटी सेन्सेक्स 366.22 म्हणजेच 0.66 टक्क्यांनी घसरुन 55,102.68 वर बंद झाला. तर निफ्टी 107.90 अंकांनी म्हणजेच 0.65 टकक्यांनी घसरुन 16,498.05 वर बंद झाला.
देशांतर्गत बाजार गुरुवारी अतिशय सुस्त होता असे जियोजित फायनांशियल सर्व्हिसेसच्या विनोद नायर यांचे म्हणणे आहे. पण त्याचवेळी बाजारातली अस्थिरता काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. छोट्या-मध्यम शेअर्सपेक्षा गुरुवारी दिग्गज शेअर्समध्ये जास्त दबाव होता. भारतासह इतर देशांनी त्यांच्या मोक्याच्या स्टॉकमधून तेलाचा पुरवठा सोडल्याने आणि ओपेकने उत्पादनात वाढ केल्याने कच्च्या तेलाच्या किमती आणखी कमी होणे अपेक्षित आहे. याशिवाय आता भारतीय बाजाराची नजर राज्यातील निवडणुकांचे निकाल आणि त्यांच्या एक्झिट पोलवर असेल. यासोबतच जागतिक संकेत, पूर्व युरोपमधील तणाव, बँक ऑफ इंग्लंड आणि यूएस फेडच्या बैठकीशी संबंधित बातम्यांवर बाजाराची नजर असेल.
व्होलेटाईल ट्रेडींग सेशननंतर निफ्टी घसरणीसह बंद झाल्याचे एलकेपी सिक्युरिटीजच्या रुपक डे यांचे म्हणणे आहे. खाली 16450 वर सपोर्ट आहे तर वरच्या बाजूला 16,700 वर रझिस्टंस दिसून येत आहे. डोजीनंतर बियरीश कँडल पॅटर्न बाजारातील नकारात्मक बाजू उघड होण्याचे संकेत देत असल्याचेही ते म्हणाले.
2 मार्चला निफ्टीने पीरियड चार्टमध्ये लोअर बोलिंजर बँडवर पॉपगन पॅटर्न तयार केल्याचे शेअरखानचे गौरव रत्नपारखी म्हणाले. वरच्या बाजूला 16,800 ने पुन्हा एकदा एक मोठा रझिस्टंचे काम केले. यानंतर निर्देशांक पुन्हा करेक्शन मूडमध्ये आला. आता पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये निफ्टी 16400-16800 च्या कंसोलिडेट होताना पाहू शकतो. यासाठी 16200 वर महत्त्वाचा सपोर्ट दिसत आहे.
ओएनजीसी (ONGC)यूपीएल (UPL)पॉवरग्रीड (POWERGRID) विप्रो (WIPRO)टेक महिंद्रा (TECHM)गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP) ट्रेंट (TRENT)श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड (SRTRANSFIN)टाटा पॉवर (TATAPOWER)
ग्रामीण विद्युकरण निगम लिमिटेड (RECLTD)नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.