'HDFC' esakal
अर्थविश्व

HDFC चा लाइफ रिटायरमेंट प्लॅन! काय आहेत वैशिष्ट्ये?

एचडीएफसी लाइफने अलीकडेच एक नवीन रिटायरमेंट प्लॅन सादर केला आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती अॅन्युइटीचा व्याजदर लॉक करू शकते.

शिल्पा गुजर

एचडीएफसी लाइफने अलीकडेच एक नवीन रिटायरमेंट प्लॅन सादर केला आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती अॅन्युइटीचा व्याजदर लॉक करू शकते.

HDFC Life Retirement Plan : एचडीएफसी लाइफने (HDFC Life) अलीकडेच लोकांसाठी एक नवीन सेवानिवृत्ती योजना (HDFC Life) आणली आहे. एचडीएफसी लाइफ सिस्टिमॅटिक रिटायरमेंट प्लॅन (HDFC Life Retirement Plan) असे त्याचे नाव आहे. निवृत्ती नियोजनासाठी हा अतिशय चांगला पर्याय असल्याचे सांगितले जात आहे. या योजनेत गुंतवणूक (Investment) करून तुम्ही तुमच्यासाठी चांगली आणि सुरक्षित सेवानिवृत्तीची तयारी करू शकता. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक करणारी व्यक्ती अॅन्युइटीचा (Annuity) व्याजदर लॉक करू शकते.

वैशिष्ट्ये (Features)

तुम्हाला या योजनेअंतर्गत गुंतवणूक (Investment) करायची असेल, तर तुम्ही मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक आणि वार्षिक आधारावर पैसे भरु शकता. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास संपूर्ण प्रीमियम परत करण्याचा पर्याय देखील आहे.

आणखी वैशिष्टये

1) ग्राहक प्रीमियम पेमेंट म्हणून 5-15 वर्षांची निवड करता येते

2) 15 वर्षांचा स्थगिती कालावधी

3) कोणत्याही वैद्यकीय चाचणीशिवाय 24 तासांत पॉलिसी होते जारी

4) ग्राहकाला निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न

5) पॉलिसी सेव्ह द डेट वैशिष्ट्यासह येते, म्हणजे तुम्हाला हवी ती तारीख स्वतः ठरवा आणि पेमेंट करा

- योजनेत गुंतवणुकीसाठी पात्रता

1) योजनेत गुंतवणूक करण्याचे किमान वय 45 वर्ष आणि कमाल 75 वर्ष असावे

2) प्रीमियम भरण्याची मुदत 5-15 वर्षांच्या दरम्यान आहे

3) स्थगिती कालावधी प्रीमियम भरण्याच्या मुदतीपासून 15 वर्षांपर्यंत सुरू होतो

4) प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक भरला जाऊ शकतो

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT