LIC  Sakal
अर्थविश्व

LIC प्रीमियम भरणे आणखी सोपे, UPI सोबत अकाउंट कसे लिंक करायचे, जाणून घ्या...

आता एलआयसीने प्रीमियम भरण्यासाठी PhonePe, Google Pay, Paytm सारख्या UPI प्लॅटफॉर्मवरुनही ही सुविधा उपलब्ध केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

एलआयसीचा हफ्ता भरणे आता अतिशय सोपे झाले आहे. आता अवघ्या काही क्लिक्सवर तुम्ही तुमच्या एलआयसीचा प्रिमियम भरु शकता. यासाठी तुम्हाला तुमची एलआयसी पॉलिसी तुमच्या युपीआय (UPI) आयडीशी एकदा लिंक करावी लागेल, त्यानंतर पुढच्या वेळेपासून तुम्ही फक्त एका मिनिटात प्रीमियम भरु शकाल. (LiC News)

एलआयसीचे चे पॉलिसीधारक, आधी फक्त ऑनलाइन बँकिंग आणि डेबिट-क्रेडिट कार्ड्स वापरुन ऑनलाइन प्रीमियम भरत होते, पण आता एलआयसीने प्रीमियम भरण्यासाठी PhonePe, Google Pay, Paytm सारख्या UPI प्लॅटफॉर्मवरुनही ही सुविधा उपलब्ध केली आहे.

गुगल पेवर एलआयसी पॉलिसी कशी लिंक करावी

1. तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay ऍपवर जा आणि होम पेजवर बिल पेमेंट पर्यायावर टॅप करा.

2. मग व्ह्यू ऑल (View all) वर जा आणि फायनान्स अँड टॅक्समध्ये इन्श्युरंस हा पर्याय निवडा.

3. इथे तुम्हाला अनेक कंपन्यांची नावे दिसतील. तुम्ही LIC वर क्लिक करा.

4. आता तुम्हाला Link Account चा पर्याय दिसेल. यामध्ये तुमचा पॉलिसी क्रमांक आणि ई-मेल टाका.

5. आता Link Account वर क्लिक करा आणि डिटेल्स तपासा.

7. यानंतर तुमची LIC पॉलिसी Google Pay वर लिंक केली जाईल. लिंक केल्यानंतर तुम्ही प्रीमियम पेमेंट करू शकता.

8. आता पेमेंटसाठी UPI पिन टाकून तुमचा प्रीमियम भरा.

पेटीएम ऍपवर एलआयसी पॉलिसी कशी लिंक करावी

1. तुमच्या स्मार्टफोनवर पेटीएम ऍप उघडा.

2. 'रिचार्ज आणि बिल पेमेंट्स' पर्यायावर जा आणि व्ह्यू मोअरवर (View more) टॅप करा.

3. आता खाली स्क्रोल करा आणि 'फायनान्शियल सर्व्हिसेस' सेक्शनमध्ये जा.

4. याच्या आत तुम्हाला LIC/Insurance चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करून LIC चा पर्याय निवडा.

5. यानंतर तुम्हाला 'पे इन्शुरन्स प्रीमियम' दिसेल, त्यावर क्लिक करा, तुमचे डिटेल्स भरा आणि प्रोसीडचे (Proceed) बटन टॅप करा, मग तुमची पॉलिसी पेटीएमशी लिंक केली जाईल.

6. पॉलिसी लिंक केल्यानंतर, तुम्ही तुमचा प्रीमियम भरू शकता. पेमेंट करण्यासाठी, तुमचा UPI पिन टाका आणि काम झाले.

एकदा तुमची पॉलिसी या ऍप्सवर लिंक झाली की तुम्ही तुमची प्रीमियम, LIC प्रीमियमची ड्यू डेट आणि बिल नंबर इ. इथे तपासू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : लोकसभेला गंमत केली आता गंमत केली तर...; अजित पवार थेटच बोलले

Paithan Vidhan Sabha: संदीपान भुमरेंच्या मुलावर प्रचार थांबवण्याची वेळ; डॉक्टरांनी सांगितलं कारण

Latest Maharashtra News Updates live : येवल्यात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत

ouchhh...! भारताला मोठा धक्का, Shubman Gill ला सराव सामन्यात दुखापत, पर्थ कसोटीला मुकण्याची शक्यता

Uddhav Thackeray: सरकार कुणी पाडलं, राज ठाकरेंबरोबर जाणार का? उद्धव ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT