अर्थविश्व

आर्थिक नियोजनात फायद्याच्या ठरणाऱ्या ६ गोष्टी, जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा

- डॉ ऋषिकेश काकंडीकर

आपल्याला श्रीमंत होऊन आनंदाने आयुष्य जगायचे असते यासाठी आपण नोकरी सुरू करतो आणि पहिल्या पगारापासूनच आपण आपल्या प्रत्येक इच्छा पूर्ण करू लागतो. कधी महागडी गॅजेट्स, कधी महागडे कपडे आणि कधी शूज यासाठी आपण खर्च करतो. नोकरी सुरू केल्यानंतर क्रेडिट कार्ड देखील सहसा उपलब्ध होते त्यानंतर, आपल आपल्या खर्चावर कोणतेही नियंत्रण राहत नाही. क्रेडिट कार्डची बिले भरणे आणि आवश्यक काम करणे यामुळे पगार संपतो. गंमत म्हणजे आपल्या भविष्यातील ध्येयाचा विचार न करता आपण खर्च आणि कर्जाच्या दलदलीत अडकत जातो.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ध्येये असतात जसे घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण आणि त्यांचे लग्न, आरामदायी निवृत्ती इ. गरजा खूप आहेत आणि संसाधने कमी आहेत. या सर्वांच्या दरम्यान, आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आपल्याला आर्थिक नियोजनाची आवश्यकता आहे. तुमचे आर्थिक नियोजन जितके मजबूत असेल तितकेच तुमचे भविष्य सुखी होईल, तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाल.

आर्थिक नियोजन म्हणजे काय?

आर्थिक नियोजनाची प्रक्रिया अगदी सोपी आहे.“आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण प्रक्रियेत, तुम्हाला आधी तुमची उद्दिष्टे ओळखणे आणि प्राधान्य देणे आवश्यक आहे. मग सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून, त्याची मर्यादित संसाधने आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वापरली पाहिजेत तसेच आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या रोख प्रवाहानुसार आर्थिक उद्दिष्टे बदलू शकता. त्याचा वेळोवेळी आढावा घेणेही आवश्यक आहे. आता आर्थिक नियोजन कसे सुरू करावे याबद्दल जाणून घेऊया.

आर्थिक नियोजनातील महत्वाचे टप्पे

१.बजेट बनवा

आर्थिक नियोजनातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे किती पैसा येतो आणि तो 0कुठे जातो हे पाहणे. कमाई सुरू करण्याबरोबरच आपण बजेटही बनवले पाहिजे. त्यानतर तुम्ही तुमचे सर्व खर्च लिहून ठेवले पाहिजेत आणि तुमच्या रोख रकमेतील कोणत्याही अप्रत्याशित खर्चाची पूर्तता कशी करावी याचीही तरतूद करून ठेवावी.

२.आपत्कालीन निधी

भविष्यात कोणत्याही अनपेक्षित खर्चाची पूर्तता करण्यासाठी आपत्कालीन निधी राखला पाहिजे. सामान्यतः लोक आपत्कालीन परिस्थितीसाठी स्वतंत्र निधी तयार करत नाहीत. आणीबाणीच्या प्रसंगी त्यांना त्यांच्या गुंतवणुकीतून पैसे काढावे लागतात. भविष्यात कोणत्याही अप्रत्याशित खर्चासाठी पुरेसा निधी बाजूला ठेवा. आता प्रश्न उद्भवतो की आपत्कालीन निधी म्हणून किती पैसे ठेवावेत? आपत्कालीन निधी एखाद्या व्यक्तीच्या मासिक खर्चाच्या किमान 6 पट असावा. नोकरी गमावल्यास किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीत हा निधी उपयुक्त आहे आणि तुमच्या गुंतवणुकीवरही परिणाम होत नाही.

३.जीवन विमा

अपघात किंवा मृत्यूसारख्या अनपेक्षित परिस्थितीमुळे उत्पन्नाचे नुकसान झाल्यास विमा तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिकदृष्ट्या संरक्षित करतो. आपल्या विम्याच्या गरजांचे मूल्यांकन करा आणि त्यानुसार पुरेसे जीवन विमा संरक्षण घ्या. सर्वसाधारणपणे जीवन विमा एखाद्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या 10-12 पट असावा. तथापि, हे एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न, वय आणि दायित्वांवर अवलंबून असते. जीवन विम्याचा सर्वात स्वस्त पर्याय म्हणजे टर्म इन्शुरन्स, जो तुम्ही घरून ऑनलाईन देखील घेऊ शकता.

४.आरोग्य विमा

आजच्या युगात, अगदी चांगल्या हॉस्पिटलमध्ये किरकोळ आजारावर उपचार घेतल्या नंतर तुमचे आर्थिक आरोग्य बिघडू शकते. कारण उपचाराचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. जर कुटुंबातील एक सदस्य आजारी पडला तर कधीकधी संपूर्ण गुंतवणूक किंवा त्यातील बहुतेक खर्च करण्याची संधी असते. म्हणून, तुमचे उत्पन्न आणि तुम्ही राहता त्या शहरावर अवलंबून पुरेसा आरोग्य विमा घेणे चांगले.

५. गुंतवणूक

आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूक महत्वाची भूमिका बजावते. गुंतवणूक ध्येयाशी निगडित असावी. जर तुम्हाला 1 वर्षानंतर कार, 5 वर्षानंतर घर खरेदी करायचे असेल किंवा तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी बचत करायची असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर आयुष्य सुखी करण्यासाठी गुंतवणूक करायची असेल. तुमची गुंतवणूक अशा उद्दिष्टांशी जोडलेली असावी.

६.कर नियोजन

प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून आपले कर नियोजन सुरू करा आणि काही रक्कम गुंतवत रहा. जर तुम्ही कर आकारणीच्या तरतुदी लक्षात ठेवल्या तर तुम्ही शेवटच्या क्षणी कोणतीही चूक करणार नाही आणि तुमचा रोख प्रवाह वर्षभर सारखाच राहू शकतो. कलम 80 सी व्यतिरिक्त कर वाचवण्यासाठी उपलब्ध असलेल्या इतर पर्यायांचे पुनरावलोकन करूनच गुंतवणूक करावी.

आपण एक लक्षात ठेवले पाहिजे की, आर्थिक योजना तयार करणे ही फक्त सुरुवात आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती योजना शिस्तबद्ध पद्धतीने राबवली गेली पाहिजे. जर तुम्ही संयमी, शिस्तबद्ध असाल तर तुम्ही स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला सुवर्ण भविष्य देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT