खामसवाडी (जि. उस्मानाबाद) : चोराखळी (ता.कळंब) येथील (Kalamb) धाराशिव साखर कारखान्यात (Sugar Mill's First Oxygen Generation Plant Operation Starts At Dharashiv Sugar Mill) तयार झालेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी (ता.१४) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आभासी बैठकीद्वारे पार पडले. या प्रसंगी श्री. ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्रात साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्माण करण्याची पहिली हिम्मत धाराशिव शुगरचे अभिजीत पाटील (Dharashiv Sugar Mill Chairman Abhijit Patil) यांनी दाखवली त्याबद्द्ल त्यांचे कौतुक केले. राज्यातील साखर कारखान्यानी ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी आवाहन केले.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार , केद्रीयमंत्री नितीन गडकरी, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री सुभाष देशमुख, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, धाराशिव शुगरचे अध्यक्ष अभिजीत पाटील, मौज इंजिनिअरींगचे ओक आदी उपस्थित होते. धाराशिव साखर कारखान्यात देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प चोराखळी येथील धाराशिव शुगर उभा करून ऑक्सिजन निर्मितीला प्रारंभ झाला आहे. (First Oxygen Generation Plant At Dharashiv Sugar Mill Operation Start In Osmanabad District)
खासदार निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी धाराशिव शुगरच्या ऑक्सिजन प्रकल्प उभारणीमुळे उस्मानाबाद जिल्हा स्वंयपीर्ण झाल्याचे सांगितले. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महाराष्ट्राला तीनशे ते साडेतीनशे टन ऑक्सिजन लागतो. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीची काम व्हावे, असे सांगितले. जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayanti Patil) यांनी राज्य ऑक्सिजनच्या विवंचनेत असताना धाराशिव शुगरने मौज इजिनिअरीगच्या तांत्रिक साह्याने प्रकल्प उभा करून पंधरा दिवसांत कार्यान्वित केला. हा प्रकल्प दिशादर्शक ठरेल प्राणवायु निर्मितीचे धाडसाचे काम साखर कारखान्यात अभिजीत पाटील यांनी केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी शरद पवार यांच्या आवाहनानंतर धाराशिवने बाजी मारल्याचा गौरवोद्गार काढले. या पुढील काळात काही अडचण आल्यास महाविकास आघाडी सरकार पूर्ण मदत करेल असे ते म्हणाले. केंद्रीयमंत्री गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी साखर कारखानदारी अडचणीत असताना धाराशिव शुगरचे अभिजीत पाटील यांनी संकटाच्या वेळी सामाजिकी बांधीलकी सांभाळत प्रयोग यशस्वी केल्याचे म्हटले. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभा करण्याची गरज त्यांनी गरज व्यक्त केली.
पंधरा दिवसांत उभारला प्रकल्प
जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, ‘‘खासदार शरद पवार यांच्या आवाहनानंतर धाराशिव शुगरने मौज इंजिनिअरिंगच्या तांत्रिक साह्याने अवघ्या पंधरा दिवसांत हा प्रकल्प उभारला. या पुढील काळात कारखान्यास काही अडचण आल्यास राज्य सरकार पूर्ण मदत करेल.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.