औरंगाबाद: Best Investment Tips: नोकरीनंतर सेवेतून निवृत्त झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्पन्नाचे स्रोत ठरलेल्या पारंपारिक आर्थिक साधनांवर किंवा योजनांवर व्याज सातत्याने कमी होत असताना दिसत आहे. सेवानिवृत्त झाल्यावर अनेक जण त्यांची कमाई एफडीमध्ये ठेवतात, ज्याचे व्याजदर 5 ते 6 टक्क्यापर्यंत झाले आहे. अशा स्थितीत सेवानिवृत्तीनंतर तुम्ही तुमची कमाई कुठं गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
1. सिनीअर सिटीझन सेव्हिंग स्कीम (SCSS)-
या जेष्ठ नागरिक बचत योजनेचा (Senior Citizen Saving Scheme ) कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त खाते उघडता येतात पण त्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. एप्रिल ते जून या तिमाहीत ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याज 7.4 टक्के आहे. पण यातून मिळालेल्या उत्पन्नावर कर लागतो.
2. प्रधानमंत्री वय वंदना योजना (PMVVY)-
आता प्रधान मंत्री वंदना योजनेची (Pradhan Mantri Matri Vandana Yojana) मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची अट कमीत कमी 60 आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 7.40 टक्के व्याज मिळाले होते. यात प्रत्येक वर्षी व्याजदर निश्चित केला जाईल. या योजनेतही 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. दहा वर्षांच्या पॉलिसी मुदतीनंतर गुंतवणुकदाराला ठेवल्यास गुंतवणूकीची रक्कम आणि अंतिम पेन्शनचे हप्ते मिळतील.
3. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS)-
या योजनेचा काळ 5 वर्षांचा असतो (Post Office Monthly Income Scheme). या योजनेत एकदा ठरलेले व्याजदर शेवटपर्यंत राहते. जूनच्या तिमाहीत संपलेल्या योजनेचे व्याजदर 6.6 टक्के होते. या योजनेत एका खात्यात जास्तीत जास्त साडेचार लाख रुपये ठेवू शकता येतील. तर जॉईंट अकाउंट काढले तर त्यात 9 लाख रुपये जमा करता येतील.
4. मुदत ठेव (FD)-
मागील काही दिवसांपासून या योजनेची (Fixed Diposit) प्रसिद्धी कमी होत असली तरी याला सर्वात मोठी 'लिक्विड इनवेस्टमेंट' मानले जाते. इथं तुम्ही तुमची गुंतवणूक कधीही काढू शकता. या योजनेचा कालावधी सात दिवस ते दहा वर्षे असू शकतो. या योजनेतील व्याज मासिक, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक आधारावर दिले जाते. सध्या कोणतीही सामान्य बँक एफडीवर सहा टक्क्यांपेक्षा जास्त व्याज देत नाही. तर जेष्ठ नागरिकांना अर्धा टक्के जास्त व्याज मिळते. एसबीआय, आयसीआयसीआय बँक आणि एडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एफडी सुरू करत आहेत.
5. फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्ड-
2020च्या फ्लोटिंग रेट सेव्हिंग्ज बॉन्डचा (Floating Rate Savings Bonds) कालावधी सात वर्षांचा आहे. दरवर्षी त्याचे व्याज दर बदलतील. त्याचा पहिला कूपन दर (1 जानेवारी, 2021 रोजी देण्यात आला आहे) 7.5 टक्के होता. कूपन दर / व्याज दर दर वर्षी 1 जुलै आणि 1 जानेवारी रोजी निश्चित केला जातो. हा कूपन दर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) च्या सध्याच्या व्याज दराशी जोडलेला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.