आर्थिक sakal
अर्थविश्व

आर्थिक स्वातंत्र्यासाठी‘फ्रीडम एसआयपी’

भारत आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे

सकाळ वृत्तसेवा

भारत आज अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहे. मात्र, लोकसंख्येतील मोठ्या गटाला अजूनही आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. एखादी व्यक्ती जी आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य आहे, असे मानले जाते जेव्हा तो किंवा ती जगण्याचे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी कोणतेही काम न करता सक्षम आहे. अनेक अभ्यासांतून आणि आकडेवारीतून असे दिसून आले आहे, की जवळपास ५० टक्क्यांहून अधिक भारतीयांनी त्यांच्या निवृत्तीपश्चात आयुष्याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही.

घरगुती बचत मागील काही वर्षांत सातत्याने कमी होत आहे. ज्यामुळे, निवृत्तीकडे झुकणाऱ्या लोकसंख्येसाठी चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. जेव्हा दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्ट; जसे निवृत्तीनंतरचे जीवन पाहिले, तर त्यासाठी एक सातत्यपूर्ण उत्पन्न आवश्यक आहे. ज्यातून एखाद्याच्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखकारक आणि आनंदमय होईल. जर अजूनही तुम्ही त्याचे नियोजन केले नसेल तर तुम्हाला काही अनपेक्षित नकारात्मक घटनांना सामोरे जावे लागू शकते, ज्यामुळे तुमचे नियोजन कोलमडू शकते. त्यामुळेच अशा क्लिष्ट उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडासारख्या कंपनीने ‘फ्रीडम एसआयपी’ ही योजना सादर केली आहे.

‘फ्रीडम एसआयपी’ म्हणजे काय?

‘फ्रीडम एसआयपी’ ही एक अशी योजना आहे, ज्यात गुंतवणूकदाराला नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून नियमित आणि शिस्तबद्ध गुंतवणूक करण्याची सवय लावते आणि मुदतपूर्तीनंतर नियमित पैसे मिळण्याचा लाभ उपलब्ध करून देते. आर्थिक स्वातंत्र्यप्राप्तीचा प्रवा सहा पुढील तीन टप्प्यांत पूर्ण करता येऊ शकतो.

पहिला टप्पा : एसआयपी ही ओपन एंडेड इक्विटी फंडामध्ये असावी. ज्यात, हायब्रीड किंवा फंड ऑफ फंड योजनेत आधीच निश्चित केलेला ८ वर्ष, १० वर्ष, १२ वर्ष किंवा १५ वर्षांसाठी दरमहा गुंतवणूकपर्याय निवडावा.

दुसरा टप्पा : एसआयपी कालावधीची निवड केल्यानंतर ‘फ्रीडम एसआयपी’च्या माध्यमातून प्राप्त केलेले युनिट्स पूर्वनिर्धारित विशिष्ट योजनेत हस्तांतर केले जातात. यात बहुतांश हायब्रीड फंडांचा समावेशअसतो. यातून निर्माण होणारी संपत्ती ही अनपेक्षित जोखीम आणि भांडवली बाजारातील अस्थिरपासून सुरक्षित असेल, याची काळजी घेतली जाते.

तिसरा टप्पा : युनिट्स हस्तांतर झाल्यानंतर सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लॅन जो एसडब्ल्यूपी नावाने लोकप्रिय आहे, तो सक्रिय होतो. जर तुम्ही ८ वर्षांसाठी एसआयपी नोंदणी केली असेल, तर तुमचे मासिक एसडब्ल्यूपी १ पट (१X) असेल.

मासिक एसआयपी हप्ता जर १०, १२ आणि १५ असेल तर विथड्रॉवल हे १.५ पट (१.५X), २ पट (२X) आणि ३ पट (३X) असेल. उदा. जर सुरवातीपासून एसआयपी ही १२ वर्षांसाठी रु.१०,००० प्रतिमहिना असेल तर एसडब्ल्यूपी हे रु. २०,००० असेल. (रु. १०,००० च्या २ पट)

(लेखक ऑल्विन फायनान्शियल सर्व्हिसेसचे पार्टनर आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा! विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT