मुंबई : EPFO आपल्या सदस्यांना अनेक फायदे देते. त्यात विमा, पेन्शन योजना आणि इतर अनेक योजनांचाही समावेश आहे. भविष्य निर्वाह निधी अंतर्गत, कर्मचार्यांच्या पगारातून दरमहा एक विशिष्ट रक्कम कापली जाते जेणेकरून ईपीएफ सदस्यांना गरज पडल्यास त्याचा लाभ घेता येईल.
जर तुम्ही अद्याप EPFO च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन PF खात्याअंतर्गत ई-नॉमिनेशन केले नसेल, तर तुमचे ७ लाख रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते.
ई-नामांकन कसे करावे
पीएफ खात्यात नॉमिनी जोडण्यासाठी सर्वप्रथम EPF च्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जा.
यानंतर सेवा पर्यायावर क्लिक करा, त्यानंतर 'कर्मचाऱ्यांसाठी' वर क्लिक करा.
त्यानंतर सदस्य UAN क्रमांकाच्या मदतीने लॉगिन करा
पुढील स्क्रीनवर, व्यवस्थापित करा टॅबवर जा, ई-नामांकन निवडा आणि आपल्या कुटुंबातील सदस्याचे नाव प्रविष्ट करा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एकापेक्षा जास्त नॉमिनी जोडू शकता.
या कागदपत्रांची आवश्यकता असेल
नॉमिनी जोडण्यासाठी नॉमिनी
आधार कार्ड
पॅन कार्ड
मोबाईल नंबर
नॉमिनी जोडल्याने हा फायदा होतो
पीएफ खात्यावर पात्र व्यक्तींना पीएफ पेन्शन आणि विमा ७ लाख रुपये दिले जातात. नॉमिनी असल्याने तुम्ही सहजपणे पैशांचा दावा करू शकता. पेसो पेमेंट ऑनलाइन पद्धतीने केले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.