Gold Rate inflation US Federal Reserve Fall in price of gold esakal
अर्थविश्व

Gold Rate : सोन्याच्या भावात घसरण

महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरवाढ चालूच ठेवणार असल्याचे संकेत अमेरिकी फेडरल रिझर्व्हने दिल्यानंतर आज देशात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदरवाढ चालूच ठेवणार असल्याचे संकेत अमेरिकी फेडरल रिझर्व्हने दिल्यानंतर आज देशात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. नवी दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅममागे ३६५ रुपयांनी घसरून ५१,३८५ रुपये झाला. चांदीचा भावही किलोमागे १०२७ रुपयांनी घसरून ५५,३०१ रुपये झाला.

शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ५१,७५० रुपये होता; तर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव १,७२१ डॉलर प्रति औंस, तर चांदीचा भाव १८.६२ डॉलर प्रति औंस होता. अमेरिकी डॉलरची मजबुती आणि कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीवर दिसून आला. त्यामुळे तसेच रुपयातील घसरणीमुळे भारतातही या मौल्यवान धातूंच्या भावात मोठी घसरण दिसून आली, असे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT