Gold Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. पण आज सोन्या चांदीचे दर चांगलेच महागले. आत्ता पर्यंतचे सर्व रेकोर्ड सोन्याच्या दराने मोडले आहेत.
गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,400 रुपये तर 24 कॅरेट साठी 57,160 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 712 रूपये आहे. (Gold Silver Price update 4 February 2023)
देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या
चेन्नई - 58,200 रुपये
दिल्ली - 57,310 रुपये
हैदराबाद - 57,160 रुपये
कोलकत्ता - 57,160 रुपये
लखनऊ - 57,310 रुपये
मुंबई - 57,160 रुपये
पुणे - 57,160 रुपये
सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.
बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.
22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?
24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.
हेही वाचा : रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी
हॉलमार्क (Hallmark)-
सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.
सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.