Gold Silver Price Sakal
अर्थविश्व

Gold Silver Price: सोनं महागलं, चांदी स्थिर! जाणून घ्या आजचे दर

गेल्या चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Gold Silver Price Today, 8th April 2022: गेल्या चार दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमती स्थिर राहिल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. चांदीचे भाव आज स्थिर असले तरी. आज म्हणजेच शुक्रवार, 8 एप्रिल रोजी 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत 400 रुपयांनी वाढ झाली आहे. यासह सराफा बाजारात सोन्याचा दर 50,200 रुपयांवर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात 28 मार्च रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने 50,300 रुपयांना विकले जात होते. मात्र, त्यानंतर त्याची किंमत 500 रुपयांनी घसरली होती. तेव्हापासून सोन्याच्या भावात चढ-उतार सुरूच होते. परंतु 4 एप्रिल रोजी तो 49,800 रुपयांवर उघडला. त्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. दुसरीकडे, गेल्या आठवड्यापासून चांदीचा भावही प्रतिकिलो 69,000 ते 71,000 रुपयांच्या दरम्यान आहे.

सोन्या-चांदीचा आजचा भाव-

सोने (22 कॅरेट): 50,200 प्रतितोळा

चांदी: 71,000 रुपये प्रतिकिलो

चालू आठवड्यातील दर-

04 एप्रिल (सोमवार): सोने रु. 49,800 (प्रति 10 ग्रॅम), चांदी रु. 71,000 (प्रति किलो)

05 एप्रिल (मंगळवार): सोने 49,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी 71,000 रुपये (प्रति किलो)

06 एप्रिल (बुधवार): सोने 49,800 रुपये (प्रति 10 ग्रॅम), चांदी रुपये 71,000 (प्रति किलो)

07 एप्रिल (गुरुवार): सोने रु. 49,800 (प्रति 10 ग्रॅम), चांदी रु. 71,000 (प्रति किलो)

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी-

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

हॉलमार्क (Hallmark)-

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी. सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

Aditya Thackeray Bag : आदित्य ठाकरेंची बॅग तपासली अन् काय सापडलं? व्हिडिओ पाहा

IPL Auction 2025 मधून तब्बल १००० खेळाडूंचा पत्ता कट; आता २०४ जागांसाठी ५७४ खेळाडू रिंगणात; जाणून घ्या तपशील

SCROLL FOR NEXT