नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या कारवाईत इराणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ठार मारण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आज खनिज तेलाचा भडका उडाला. यामुळे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. याच परिणाम होऊन जागतिक पातळीवर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाली.
सोन्याचा भाव प्रतिऔंसला 1 हजार 547 डॉलरवर गेला तर, चांदीचा भाव प्रतिऔंस 18.30 डॉलरवर पोचला. दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 752 रुपयांनी वाढून 40 हजार 652 रुपयांवर पोचला. याचबरोबर चांदीचा भाव प्रतिकिलोमागे 960 रुपयांनी वधारून 48 हजार 870 रुपयांवर गेला.
जागतिक पातळीवरील भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या सोन्याकडे मोर्चा वळविला. यामुळे सोन्याच्या भावात तेजी निर्माण झाली, अशी माहिती एचडीएफसी सिक्युरिटीजचे देवर्ष वकील यांनी दिली. अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'चे पतधोरण निर्णय 10 व 11 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. याकडे सोने व्यापाऱ्यांचे लक्ष लागले असून, "फेडरल रिझर्व्ह'कडून व्याजदरात कपात झाल्यास सोन्याच्या भावातील तेजी ओसरण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्लेषकांनी दिली.
मध्य-पूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत. यामुळे सोन्याच्या भावात आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
- नवनीत दमानी, मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.