मुंबई : जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट मिळू शकते. वास्तविक, केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचा शिल्लक डीए जुलै महिन्यात पाठवू शकते. याशिवाय सरकार कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करू शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.
या सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२० ते जून २०२१ पर्यंतचा डीए अद्याप मिळालेला नाही. आणि त्यामुळेच हे सर्व कर्मचारी आता सरकारकडे त्यांच्या थकित डीएच्या पैशांची मागणी करत आहेत. कोरोना महासाथीमुळे सरकारने हे DA पैसे बंद केले होते, परंतु आता एकाच वेळी १८ महिन्यांचे पैसे सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.
सर्व कर्मचार्यांना त्यांच्या पगाराच्या बँडनुसार हे डीएचे पैसे मिळतील आणि सरकार सर्व कर्मचार्यांच्या खात्यात एकाच वेळी २ लाख रुपये टाकू शकते असेही सांगितले जात आहे. सरकारकडून हा डीए भरताना पहिल्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना 11880 ते 37 हजार रुपये मिळू शकतात. त्याचबरोबर तेराव्या टप्प्यातील कर्मचाऱ्यांना 1 लाख 44 हजार 200 ते 2 लाख 18 हजार 200 रुपये सरकार देऊ शकते.
जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना त्यांच्या डीएचे पैसे सरकार अदा करू शकेल, याबाबत सरकारकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. मात्र वाढती महागाई लक्षात घेऊन सरकार या कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करू शकते, याचा अंदाज बांधता येतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.