Service-Sector Sakal
अर्थविश्व

सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर उच्चांकी

मे महिन्यात निर्देशांक ५८.९; अकरा वर्षांतील सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - मागणी वाढल्यामुळे देशातील सेवा क्षेत्राच्या वाढीने मे महिन्यात गेल्या ११ वर्षांतील उच्चांक नोंदवला आहे. मे महिन्यात सेवाक्षेत्राच्या वाढीचा निर्देशांक ५८.९ नोंदवला गेला. एप्रिलमध्ये तो ५७.९ होता. एप्रिल २०११ नंतर प्रथमच ही एवढी वाढ नोंदवली गेली आहे, असे एस. अँड पी. ग्लोबल इंडिया सर्व्हिसेसने आपल्या मासिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे. मात्र महागाईमुळे उत्पादन खर्चात वाढ झाल्याचा दबावही या क्षेत्रावर दिसत असून, महागाईच्या दबावामुळे नोकरीच्या आघाडीवर सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी मे महिन्यात अतिरिक्त कामगार घेण्याचे टाळले आहे. त्यामुळे रोजगारामध्ये किरकोळ घट झाली, असेही या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार, २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था ४.१ टक्क्यांनी वाढली आणि वार्षिक विकास दर ८.७ टक्क्यांपर्यंत वाढला. चलनवाढीमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने मे महिन्यात रेपोदर ४० आधारभूत अंकांनी वाढवला होता. आता ८ जून रोजी पतधोरण समितीच्या बैठकीत अशीच उपाययोजना केली जाण्याची अपेक्षा आहे, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

कोविड-१९ नंतर रुळावर आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत मागणी वाढल्याने नवीन व्यवसायाच्या वाढीलाही गती आली. परिणामी सेवा क्षेत्रालाही चालना मिळाली आहे. मात्र अन्नधान्य, इंधन, मजुरी, वाहतूक खर्च यांत वाढ झाल्याने सेवा क्षेत्रातील कंपन्यांवर दबाव वाढला आहे. हा वाढीव खर्चाचा भार ग्राहकांकडे वळवण्याशिवाय पर्याय नसल्याचे अनेक कंपन्यांनी म्हटले आहे.

- पॉलिआना डी. लिमा, सहसंचालक एस. अँड पी. ग्लोबल (आर्थिक विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT