आधार क्रमांकाद्वारे कोणी तुमच्या बॅंक बॅलन्सवर डल्ला मारू शकेल? Sakal
अर्थविश्व

आधार क्रमांकाद्वारे कोणी तुमच्या बॅंक बॅलन्सवर डल्ला मारू शकेल?

आधार क्रमांकाद्वारे कोणी तुमच्या बॅंक बॅलन्सवर डल्ला मारू शकेल? जाणून घ्या सत्यता

सकाळ वृत्तसेवा

आधार कार्ड ही आज भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गरज बनली आहे.

आधार कार्ड (Aadhar Card) ही आज भारतात (India) राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची गरज बनली आहे. आधार कार्डाशिवाय आता बॅंक खाते (Bank Account) उघडता येत नाही, सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, मुलांना शाळेत प्रवेश घेता येत नाही अन्‌ इतकंच काय तर कोरोनाची लस (Covid Vaccine) घेण्यासाठीही आधार कार्ड आवश्‍यक आहे. आधार कार्डाच्या या महत्त्वामुळे आधार कार्डशी संबंधित फसवणुकीच्या (Fraud)) घटनाही वाढल्या आहेत. आधार फ्रॉडशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे 'हिंदुस्थान'ने प्रसिद्ध केली आहेत, जी स्वतः आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI (Unique Identification Authority of India) ने दिली आहेत. (Hackers will not be able to empty your bank account with Aadhaar number)

आधार क्रमांकाद्वारे हॅकर्स बॅंक खाते रिकामे करू शकतात का?

आज आपल्या सर्वांची बॅंक खाती आधार कार्डशी जोडलेली आहेत. अशा परिस्थितीत हा प्रश्न लोकांना सतावतो, की आधार क्रमांकावरून फसवणूक होऊ शकते का? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपल्या सर्वांचा संभ्रम दूर करणारे उत्तर देखील उपलब्ध आहे. UIDAI म्हणते की, ज्याप्रमाणे कोणीही फक्त तुमचा बॅंक खाते क्रमांक जाणून घेऊन तुमच्या खात्यातून पैसे काढू शकत नाही, त्याचप्रमाणे आधार लिंक केलेल्या बॅंक खात्यातून कोणीही फक्त तुमचा आधार क्रमांक जाणून घेऊन पैसे काढू शकत नाही.

जर कोणाकडे तुमचा आधार क्रमांक असेल, तर बॅंक खात्यातून पैसे काढू शकेल का?

नाही. ज्याप्रमाणे दुसऱ्याचा खाते क्रमांक माहीत आहे, त्याचप्रमाणे कोणीही त्या खात्यातून पैसे काढू शकत नाही. त्याचप्रमाणे, खात्याशी जोडलेला आधार क्रमांक माहीत असल्याने, त्याच्याशी जोडलेल्या खात्यातून पैसे काढता येत नाहीत. खात्यातून पैसे काढण्यासाठी बॅंकेची एक निश्‍चित प्रक्रिया आहे, ज्यामध्ये खातेदाराने स्वतः शाखेत उपस्थित असणे आवश्‍यक आहे किंवा त्याच्या चेकवर योग्य स्वाक्षरी असणे आवश्‍यक आहे किंवा त्याच्याकडे पिन असणे आवश्‍यक आहे, एटीएम (ATM) किंवा डिजिटल व्यवहारासाठी (Digital Transaction) ओटीपी (OTP), पासवर्ड असणे आवश्‍यक आहे. तसेच नवीन पासवर्ड किंवा पिनसाठी बॅंका अनेक माहिती एकत्र भरण्यास सांगतात, नवीन पासवर्ड किंवा पिन केवळ एका माहितीवर जारी केला जात नाही. अशा परिस्थितीत आधार क्रमांकाची माहिती कुणालाही देण्यात काही गैर नाही.

आधार लिंक्‍ड फसवणूक जर कोणाशी झाली असेल तर त्यांनी ही चूक केली असेल का?

फसवणूक करणारे मोठ्या रकमेचे आमिष दाखवून किंवा कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून किंवा अन्य मार्गाने तुमची वैयक्तिक माहिती मागतात, ज्यामध्ये जन्मतारीख, पॅन कार्ड (Pan Card) माहिती, यूजर आयडी, ओटीपी, पासवर्ड किंवा पिन आदींचा समावेश आहे. बॅंकेचे कर्मचारी तुमच्याकडून ही माहिती कधीच विचारत नाहीत, असे बॅंक आणि सरकार सतत लोकांना समजावून सांगत असते. अनोळखी नंबरवरून येणाऱ्या कोणत्याही फोनवर अनेकदा लोक आपली वैयक्तिक माहिती देतात आणि फसवणूक करणाऱ्यांच्या तावडीत सापडून नुकसान करून घेतात. बॅंका स्पष्टपणे सांगतात की कोणत्याही परिस्थितीत तुमचा ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा यूजर आयडी कोणालाही सांगू किंवा देऊ नका. त्याच वेळी, काही शंका असल्यास आपल्या बॅंकेच्या शाखेशी संपर्क साधणे उत्तम.

जर आधार कार्ड फसवणूक करणाऱ्याच्या हाती पडले आणि त्याने तुमच्या नावावर खाते उघडण्याचा प्रयत्न केला तर?

काहीही नाही. सरकारी नियमांनुसार इतर कागदपत्रांसह आधार कार्डद्वारे बॅंक खाते उघडता येते. मात्र, आधार कार्ड मिळाल्यानंतर बॅंकांना खाते उघडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेतून जावे लागते आणि पडताळणी पूर्ण करावी लागते. अशा परिस्थितीत कोणताही फसवणूक करणारा केवळ आधार कार्डची प्रत घेऊन तुमच्या संमतीशिवाय तुमच्या नावावर खाते उघडू शकत नाही. असे झाल्यास ती बॅंकेची चूक मानली जाईल, आधार कार्डधारकाची नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT