HCL Tech Share sakal
अर्थविश्व

HCL Tech Share : HCL कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण; जाणून घ्या काय आहे कारण?

कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणुकदारांसाठी शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे.

सकाळ डिजिटल टीम

एचसीएल टेकच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे, परंतु विश्लेषक अजूनही कंपनीच्या भविष्याबद्दल खूप सकारात्मक आहेत. काही ब्रोकरेज कंपन्यांचा एचसीएल टेकच्या शेअर्सवर आणखीन विश्वास आहे.

देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या एचसीएल टेकच्या शेअर्समध्ये गेल्या दोन दिवसांत 7.5 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर्स आज रुपये 1,026.15 वर आहेत.

हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

सोमवारी कंपनीचे शेअर्स 5.86 टक्क्यांनी घसरून 1,258.75 रुपये प्रति शेअरवर बंद झाले. मंगळवारी देखील, कंपनीचे शेअर्स बजार उघडताच सुरुवातीला 1.81 टक्क्यांनी घसरले. HCL टेक शेअरची किंमत आज 1,235.95 रुपये प्रति शेअर आहे. मात्र, त्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये थोडी तेजी दिसून झाली आणि दुपारी 12:20 वाजता कंपनीचे शेअर 1.37 टक्क्यांनी घसरून 1,241.55 रुपयांवर होते.

काय आहे घसरणीचे कारण :

कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर (HCL Tech Oct-Dec Quarter 2022 Result) कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 13.6 टक्क्यांनी घट होऊन तो 3,442 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे, कंपनीने ऑक्टोबर-डिसेंबर 2020 च्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर 2021 तिमाहीत महसुलात 15.7% ची घट नोंदवली होती.

एचसीएल टेकच्या निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती, परंतु विश्लेषक अजूनही कंपनीच्या भविष्याबद्दल खूप सकारात्मक आहेत. काही ब्रोकरेज कंपन्यांनी एचसीएल टेकचे टार्गेट आणखी वाढवले ​​आहे. दुसरीकडे, कंपनीच्या शेअरच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे गुंतवणुकदारांसाठी शेअर्स खरेदी करण्याची संधी आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी विजयकुमार म्हणाले: “ऑक्टोबरमध्ये, कंपनीचे शेअर्स 13.5% वरून 14.5% पर्यंत वाढवले होते. सध्या कंपनीचे शेअर्स घसरले असले तरी, येत्या काही महिन्यात ते वाढण्याची शक्यात आहे"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT