एचडीएफसीने दिलेले हे व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.
- शिल्पा गुजर
देशातील आघाडीची गृहनिर्माण वित्त (Housing Finance) कंपनी एचडीएफसीने सणांचा हंगाम (Festive Season) पाहता गृहकर्जाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्यात ग्राहक वार्षिक 6.70 टक्के व्याज दराने गृहकर्ज घेऊ शकतील. एचडीएफसीने दिलेले हे व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले आहेत. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.
एचडीएफसीची विशेष गृहकर्जाची ऑफर ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरशी जोडली जाईल. ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर ते त्यांना हवे तेवढे कर्ज 6.70 टक्के दराने घेऊ शकतात. या ऑफरमध्ये HDFC ने एम्प्लॉयमेंट कॅटेगरीच्या आधारावर व्याजदरातील फरक देखील दूर केला आहे. म्हणजेच, तुम्ही पगारदार आहात किंवा व्यापारी आहात, तुम्ही तुमच्या क्रेडिट स्कोअरनुसार या स्वस्त होम लोन ऑफरचा लाभ घेऊ शकता.
गेल्या काही वर्षांपासून देशातील प्रमुख बाजारपेठांमध्ये निवासी मालमत्तांच्या किंमती कमी-अधिक सारख्याच राहिल्या आहेत. त्याचबरोबर लोकांचे उत्पन्न वाढले आहे. गृहकर्जाचे कमी व्याज दर, प्रधानमंत्री आवास योजनेशी जोडलेली सबसिडी आणि इतर कर सवलतींमुळे घरांची विक्री वाढण्याची अपेक्षा असल्याचे एचडीएफसी लिमिटेडच्या एमडी रेणू सूद कर्नाड यांनी म्हटले.
एचडीएफसी, कोटक महिंद्रा बँक, पीएनबी, एसबीआय, बीओबी यांनी देखील गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.