HDFC Stock sakal
अर्थविश्व

HDFC च्या स्टॉकमध्ये 36 टक्के वाढीची शक्यता, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला

ऑक्टोबर -डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एचडीएफसीच्या निव्वळ नफ्यात 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शिल्पा गुजर

HDFC Ltd : हाउसिंग फायनान्स कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC Ltd) डिसेंबर तिमाहीचे (Q3FY22) निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आहेत. ऑक्टोबर -डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एचडीएफसीच्या निव्वळ नफ्यात (Profit)11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीचे व्याजातून (Interest) होणारे उत्पन्नही वाढले आहे. निकालानंतर ब्रोकरेज हाऊसनी एचडीएफसीच्या शेअर्समध्ये (Share Maeket) गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

ब्रोकरेज हाऊसचे मत ?

एचडीएफसी लिमिटेड कंपनीची कामगिरी चांगली राहिल्याचे बहुतांश ब्रोकरेज हाऊसेसचे मत आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म मॉर्गन स्टॅनलीने एचडीएफसी शेअरवर ओव्हरवेटचे रेटिंग दिले आहे आणि 3,340 रुपयांचे टारगेट दिले आहे. सिटीने (CITI) 3,300 रुपयांचे टारगेट दिले आहे. याशिवाय, सीएलएसएने (CLSA) आउटपरफॉर्मचे रेटिंग कायम ठेवत 3050 रुपयांचे टारगेट दिले आहे.देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने एचडीएफसी लिमिटेडला 3,550 टारगेट देत खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 2 फेब्रुवारीला शेअर 2612 रुपयांवर बंद झाला. म्हणजेच, गुंतवणूकदारांना येत्या काळात सुमारे 36 टक्के परतावा मिळू शकतो. मोतीलाल ओसवाल यांनी एचडीएफसी लिमिटेडच्या शेअरवर खरेदी सल्ला देऊन 3,200 रुपयांचे टारगेट दिले आहे.3QFY22 ही कंपनीसाठी चांगली तिमाही ठरल्याचे ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे. डिस्‍बर्समेंट मोमेंटम मजबूत आहे आणि इंडिविजुअल सेगमेंट कलेक्‍शनही चांगले राहिले आहे. गेल्या 12 तिमाहीत क्रेडिट कॉस्ट किमान 26 बेसिस पॉइंट्स आहे. मोतीलाल ओसवाल यांनी FY23-FY24 मध्ये 14 टक्के AUM वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. FY24E मध्ये कोर RoA सुमारे 1.9 टक्के आणि RoE 1.3 टक्के अपेक्षित आहे.

एचडीएफसी लिमिटेडचे निकाल ?

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत एचडीएफसी लिमिटेडचा (HDFC LTD) स्वतंत्र निव्वळ नफा 11 टक्क्यांनी वाढून 3,260.6 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा 2,925.8 कोटी होता. या काळात कंपनीचा महसूल अर्थात रेव्हेन्यू वाढून 11,783.6 कोटी झाला. जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 11,707 कोटी होता. कंपनीचे नेट इंटरेस्‍ट मार्जिन (NIM) 3.6 टक्के आहे. बँकेचे व्याजातून नेट इन्कम (NII) 7 टक्क्यांनी वाढून 4,284 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur North: काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमधून उमेदवार बदलला, मधुरीमाराजेंना उमेदवारी

Shivsena Candidate List: शिवसेनेची तिसरी यादी जाहीर! १५ जणांच्या नावांचा समावेश, दोन जागा मित्रपक्षांना; शायना एनसी यांना उमेदवारी

Pradip Sharma: एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांचं बंड! शिवसेनेचा आदेश डावलून पत्नीचा अपक्ष अर्ज भरणार

Chetna Pagydyala : १६ वर्षीय चेतनाने मोडला मिताली राजचा विक्रम; १९७३ सालचा पराक्रमही उध्वस्त, संघाचा ऐतिहासिक विजय

Video Viral: ''शिंदेंनी फसवलं, उद्धव ठाकरेच आमच्यासाठी देव'' उमेदवारी नाकारल्यानंतर श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले; अन्नही सोडलं

SCROLL FOR NEXT