Money 
अर्थविश्व

आर्थिक वर्ष 20-21: अशी 9 कामे जी तुम्हाला 31 मार्चच्या आधीच करावी लागतील पूर्ण

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : 31 मार्च 2021 रोजी हे आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे अनेक आर्थिक कामांशी निगडीत असलेली अंतिम तारीख 31 मार्च 2021 ही असणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून नवं आर्थिक वर्ष सुरु होत आहे. या नव्या आर्थिक वर्षांत अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट आपल्या खिशावर परिणाम होणार आहे. जर तुम्ही 31 मार्चच्या आधी तुमची ती कामे  पूर्ण केली नाहीत तर तुम्ही नंतर अडचणीत सापडू शकता, हे नक्की... अशी कोणकोणती महत्त्वाची कामे आहेत, हे आपण जाणून घेऊयात...

1. डबल टॅक्सेशनपासून वाचण्यासाठी डिक्लेरेशन देणे
द सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने 2020-21 या आर्थिक वर्षांत मिळवलेल्या उत्पन्नावर दुप्पट कर लागू झालेल्या परदेशी नागरिकांना आणि अनिवासी व्यक्तींना कोरोना व्हायरसमुळे भारतात नाईलाजाने राहिल्याने त्यांना संबंधित माहिती 31 मार्च, 2021 च्या आधी दाखल करण्यास सांगितले आहे. 3 मार्च 2021 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विभागाने संबंधित व्यक्तींना सांगितले आहे की, DTAA कडून देण्यात आलेल्या सवलतीचा लाभ घेऊनही जर त्यांना डबल टॅक्स भरावा लागला असेल तर ते Form-NR मध्ये याबाबत माहिती सादर करू शकतात. त्यामुळे विभाग अशा संबंधितांना सामान्य सवलत किंवा विशेष सवलत देण्याचा विचार करेल.

2. आधार-पॅन कार्ड लिंक करणे
कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सरकारने आधार-पॅन एकमेकांशी लिंक करण्याची अंतिम मुदत 30 जून 2020 वरुन 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली होती. हे खूपच महत्त्वाचे काम असून सरकारकडून याबाबत वारंवार निर्देश दिले जात आहेत. जर आपण आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर 31 मार्चपर्यंत ते करुन घ्यावं. जर या तारखेपर्यंत या दोन्हींचं लिंकींग झालं नाही तर तुमचं पॅन कार्ड रद्दबातल ठरू शकतं. आजकाल सगळ्याच कामांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची गरज असते त्यामुळे हे काम खूपच महत्त्वपूर्ण आहे. 

3. LTC कॅश व्हाऊचर स्कीमअंतर्गत बिल जमा करणे
एलटीसी कॅश व्हाउचर योजनेअंतर्गत कर सवलतींचा लाभ घेण्यासाठी, GST रक्कम आणि विक्रेत्याचा GST क्रमांक असलेली योग्य बिले आपल्या एम्प्लॉयरला (एम्प्लॉयर योजना देत असेल तर) 31 मार्च, 2021 रोजी किंवा त्यापूर्वी सादर केली गेली असतील, याची खात्री करुन घ्या. योजनेनुसार कर्मचार्‍यांना 12 टक्के किंवा त्याहून अधिक जीएसटी असणार्‍या वस्तू आणि सेवांवर LTA फेअर म्हणून समजल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा तिप्पट खर्च करावा लागतो.

4. आर्थिक वर्ष 2020-2021 साठी सुधारित / उशीरा ITR दाखल करण्याची अंतिम तारीख
आर्थिक वर्ष 2020-21 साठी सुधारित किंवा उशीरा इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्यासाठी ज्या व्यक्तींच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही अशांसाठी शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे. स्वतंत्रपणे दाखल केलेले ITR भरण्यास उशीर  झाल्यास 10 हजार रुपये लेट फी भरावी लागेल. मात्र, पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्‍या छोट्या करदात्यांसाठी लेट फाइलिंग फी एक हजार रुपये असेल. त्याचप्रमाणे, आर्थिक वर्ष 2019-20 साठी आपल्या मूळ ITR मध्ये एखादी चूक आढळल्यास आपण 31 मार्च 2021 पर्यंत सुधारित ITR दाखल करू शकता.

5. आर्थिक वर्ष 2020-21 साठीची टॅक्स सेव्हींग एक्सरसाईज पूर्ण करा
जर आपण जुन्या करप्रणालीचा पर्याय निवडला असेल तर 31 मार्च 2021 पर्यंत आपण आपली कर-बचत गुंतवणूक / खर्च पूर्ण केले असल्याचे सुनिश्चित करा. जर ही तारीख निघून गेली तर आपण आर्थिक वर्ष 2020-21 साठी आपले आयकर उत्तरदायित्व कमी करण्याची संधी गमवून बसाल.

6. 'विवाद से विश्वास' योजनेसाठी डिक्लेरेशन जमा करणे
26 फेब्रुवारी 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे सरकारने 'विवाद से विश्वास योजने' अंतर्गत वादविवादाचे निराकरण करण्याच्या अंतिम मुदतीची तारीख 28 फेब्रुवारी 2021 वरुन 31 मार्च 2021 पर्यंत वाढवली आहे. एखाद्या व्यक्तीने डिक्लेरेशन दाखल केल्यानंतर पेमेंटची रक्कम ऍडीशिनल अमाउंटशिवाय 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी भरली जाऊ शकते.

7. स्पेशल फेस्टीव्हल ऍडव्हान्स स्कीमचा लाभ घेण्याची अंतिम तारीख
सरकारी कर्मचारी 31 मार्च 2021 रोजी किंवा त्यापूर्वी 10,000 रुपयांच्या बिनव्याजी विशेष आगाऊ रक्कम घेऊ शकतात. एलटीसी कॅश व्हाउचर स्कीमसह सरकारने ऑक्टोबर 2020 मध्ये या खास योजनेची घोषणा केली होती. सरकारी कर्मचाऱ्याने घेतलेली आगाऊ रक्कम जास्तीत जास्त 10 हप्त्यांमध्ये वसूल केली जाईल.

8. पीएम आवास योजनेमध्ये 31 मार्चपर्यंत रजिस्ट्रेशन
पीएम आवास योजनेतील क्रेडीट सबसिडीचा लाभ घेण्यासाठीची अंतिम मुदत 31 मार्च आहे. 6 लाख ते 18 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न असणार्‍या मध्यम-उत्पन्न गटांना गृह-कर्जावर अटी व शर्तींच्या आधारे ही योजना क्रेडीट सबसिडी देते. गृह कर्जावरील कमी व्याजदरामुळे ही योजना कर्जदारांवरील ईएमआयचा भार कमी करण्यास मदत करते.

9. एमर्जन्सी क्रेडीट लाईन गॅरंटी स्कीमचा शेवट
आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत सरकारने एमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी योजनेची घोषणा 13 मे 2020 रोजी केली होती. या योजनेत व्यवसायाच्या उद्देशाने कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या  व्यक्तींसह विविध संस्थांना पूर्णपणे हमी दिलेली आणि collateral-free कर्ज दिली गेली आहेत. योजनेअंतर्गत लाभ घेण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT