Tax on Gold esakal
अर्थविश्व

तुम्ही घरी किती सोने ठेवू शकता? एवढ्या सोन्यावर लागत नाही Tax

प्रत्येक भारतीयांचे सोने वापरणे हे आकर्षण आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येक भारतीयांचे सोने वापरणे हे आकर्षण आहे.

प्रत्येक भारतीयांना सोने (Gold) वापरणे हे आकर्षण असतं. गुंतवणुकीचे हे उत्तम माध्यम तर आहेच, पण सोन्याचे दागिनेही तुमचे व्यक्तिमत्त्व उजळून टाकतात. स्त्रियांना सोन्याच्या दागिन्यांची जास्तच आवड असते. अशा परिस्थितीत घरात ठेवलेल्या सोन्यावर किती टॅक्स आकारला जातो हे तुम्हाला माहितेय का? चला ते जाणून घेऊयात.

अनेक वेळा असा प्रश्न मनात येतो की, सरकार जेव्हा प्रत्येक गोष्टीवर कर आकारत असेल, तर घरात ठेवलेल्या सोन्यावर आयकराची (Income Tax) धाड पडू शकते का? असं झालं तर तुमच्याकडे किती सोनं आहे यावर कर लागणार नाही. आयकर तज्ज्ञ बळवंत जैन सांगतात की, तुम्हाला विशिष्ट प्रमाणात सोने ठेवण्याची मुभा आहे, त्यावर कर लागत नाही.

500 ग्रॅमपर्यंतच्या सोन्यावर इन्कम टॅक्स नाही

तुमच्या घरात 500 ग्रॅमपर्यंत सोनं असेल तर ते आयकराच्या कक्षेत येणार नाही. एवढेच नव्हे तर यावर उत्पन्नाचे स्रोत सांगण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच आयकर कायद्यानुसार एखादी व्यक्ती कोणत्याही उत्पन्नाच्या पुराव्याशिवाय आपल्या घरात 500 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवू शकते. कोणत्याही प्रकारच्या धाडीत किंवा तपासात आयकर विभाग हे सोनं जप्त करू शकणार नाही.

या वर्गाला आहे सोनं ठेवण्याची परवानगी

- विवाहित महिलांसाठी 500 ग्रॅमपर्यंत सोनं ठेवण्याची परवानगी

- अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेवू शकतात

- पुरुषांना उत्पन्नाच्या दाखल्याशिवाय 100 ग्रॅमपर्यंत सोने ठेवण्याची परवानगी आहे.

गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी बनवले नियम

एंजल ब्रोकिंगचे डिप्‍टी वाइस प्रेजिडेंट (कमोडिटीज) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आयकरदाते आणि गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी असा नियम तयार केला आहे. यामध्ये 500 ग्रॅमपर्यंतचे सोने कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय ठेवण्याची परवानगी देण्यात आली, जेणेकरून आयकर विभागाच्या कार्यवाहीदरम्यान अनावश्यक त्रास होऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मराठा समाजातील लोकांवर लाठीमार-गोळीबार, फडणवीसांनी मराठ्यांना गृहीत धरू नये'; सतेज पाटलांचा इशारा

Latest Maharashtra News Updates live : पुण्यात औंध येथे अडीच किलो सोने जप्त

Raj Thackeray: एकदा सत्ता माझ्या हातात द्या, मशिदींवरील भोंगे ४८ तासांत उतरवू

Snapchat New Feature : खुशखबर! स्नॅपचॅटमध्ये आलं भन्नाट फीचर; तुम्ही पाहिलं काय?

Michael Waltz : मायकेल (माइक) वाल्ट्झ- `इंडिया कॉकस’ व भारत

SCROLL FOR NEXT