Pancard Sakal
अर्थविश्व

दहा मिनिटांत काढा इन्स्टंट पॅनकार्ड; असं करा अप्लाय

सुमित बागुल

PAN परमनंट अकाउंट नंबर म्हणजेच पॅन कार्ड एक महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. तुमचा पगार इन्कम टॅक्स च्या सूट पेक्षा जास्त आहे तर तुमच्या जवळ पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे. पॅन कार्ड (PAN Card) बनवण्यासाठी तुम्हाला ऑफिस मध्ये जाऊन अर्ज द्यावा लागत होता. (How to apply for PAN card) पण आता ऑनलाइन (Online Pan Card application) अर्ज दाखल केला जातो. ही किए ऑनलाइन पण कर्डसाठी अर्ज दाखल करणे आता आणखी सोपे झाले आहे. अर्ज केल्यानंतर अगदी काही मिनटांमध्ये तुम्हाला पॅन कार्ड मिळते. अप्लाय केल्यानंतर ताबडतोब ई-पॅन डाउनलोड करता येते.

देशातली सर्वात मोठी संस्था केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) ने ई-पॅन सुविधा सुरू केली होती. तुम्हीसुद्धा जर ई-पॅन साठी अप्लाय केले असेल तर तुम्हाला CBDT ई-मेल वर पॅन कार्ड ची सॉफ्ट कॉपी PDF फॉर्मेट मध्ये पाठवते. तुम्ही तुमच्या ई-मेल आयडी वरून PAN डाउनलोड करू शकता. सोबतच पॅन कार्ड हरवल्यास, फाटल्यास किंवा खराब झाल्यास ड्युप्लिकेट कार्डसाठी सुद्धा ई-पॅन डाऊनलोड करू शकता.

इन्स्टंट PAN कार्डसाठी अप्लाय कसे करायचे ?

  • सगळ्यात आधी इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग पोर्टल वर जा आणि “Instant PAN through Aadhaar” सेक्शन मध्ये “Quick Links” वर क्लिक करा.

  • त्यानंतर नव्या पेज वर “Get New PAN” या ऑप्शनवर क्लिक करा.

  • नविन पॅन कार्डसाठी तुमचा आधार नंबर टाका आणि Captcha कोड टाईप केला की तुमच्या आधारशी लिंक्ड मोबाइल नंबरवर OTP जनरेट करा.

  • ओटीपीला प्रमाणित करा.

  • आधार डिटेल्स प्रमाणित करा.

  • पॅन कार्ड ॲप्लीकेशनसाठी ई-मेल आयडीलाही प्रमाणित करायचा ऑप्शन असेल.

  • आधार नंबर ई-केवायसी डेटाला यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सोबत जोडला जाईल, त्यानंतर तुम्हाला इंस्टंट पॅन मिळेल. या संपूर्ण प्रक्रियेला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही.

e-PAN कसे करायचे डाउनलोड ?

  • सगळ्यात आधी या वेबसाइटवर क्लिक करा.

  • https://www.myutiitsl.com/PAN_ONLINE/PANApp

  • अर्जदार या बॉक्समध्ये स्वतंत्र अर्थात इन्डिविज्यूअल सिलेक्ट करा.

  • यानंतर सिलेक्ट द रिक्वायर्ड ऑप्शनमध्ये फिजिकल PAN कार्ड आणि ई-पॅन सिलेक्ट करून त्या खाली विचारली गेलेली माहिती भरा.

  • त्यानंतर खालील सबमिट बटनवर क्लिक करा.

  • पूर्ण फॉर्म भरल्यानंतर अधिकारी तुम्ही दिलेली माहिती चेक करतात.

  • थोड्याच वेळात ई मेल आयडीवर पीडीएफ फॉर्मेट मध्ये ई-पॅन मिळेल.

फ्री आणि पेपरलेस प्रोसेस

नवे PAN कार्ड मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया अगदी सोपी, फ्री आणि पेपरलेस आहे.यात तुम्हाला पोर्टलवर कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ही सुविधा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे आधीपासून पॅन कार्ड नाही आहे, तसेच ज्यांचा मोबाइल नंबर आधार नंबरशी लिंक आहे आणि आधार कार्डवर पूर्ण जन्मतारीख दिली आहे. सोबतच ई-पॅन ही सुविधा अल्पवयीन मुलांसाठी नाही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT