तुम्ही तपासाच्या कक्षेत आला असाल (taxpayers under the scanner) तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयकर विभागाने (Income Tax Department) तपासाधीन करदात्यांना (Taxpayers) 31 मार्च 2022 पर्यंत नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. याबाबत आयकर विभागाने ट्विट करून करदात्यांना आवाहन केले.
डिपार्टमेंटकडून अपडेट ज्या करदात्यांची प्रकरणे तपासात आहेत त्यांच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने हे ट्विट केले आहे. 31 मार्च 2022 पर्यंत नोटीसला उत्तर द्या असे यात म्हटले आहे. कृपया डिपार्टमेंटकडून मागितल्या जाणाऱ्या सूचना/माहितीबाबत नोटिशीचे वेळेवर उत्तर द्या. नोटीशीला उत्तर न दिल्यास, उपलब्ध सामग्रीच्या आधारे वाद मिटवला जाईल. आयकर कायद्याच्या कलम 144 अन्वये (Section-144 of the Income Tax Department Act), प्राप्तिकर अधिकारी एकूण उत्पन्नाचे किंवा तोट्याचे मूल्यांकन करू शकतो आणि त्या आधारावर, त्याचा निर्णय देऊ शकतो की करदात्याने किती कर भरायचा आहे.
आयकर विभागाने करदात्यांना येणाऱ्या समस्या किंवा तक्रारीसाठी दोन ई-मेल आयडी उपलब्ध करून दिले आहेत. ITR.helpdesk@incometax.gov.in TAR.helpdesk@incometax.gov.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.