spicejet airline  Sakal
अर्थविश्व

Kingfisher नंतर आता SpiceJet येणार गोत्यात? काय घडलंय जाणून घ्या

विमानांच्या सुरक्षेबाबत अडथळ्यांची शर्यत झाल्यानंतर आता कंपनीवर बँकाही खूश नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सप्रमाणं आता स्पाईसजेट लिमिटेड ही विमान कंपनी देखील गोत्यात येणार अशी चिन्हं आहेत. त्याचं कारण म्हणजे या कंपनीची बँकांकडील कर्जे मोठ्या प्रमाणावर थकली असून या थकीत कर्जांना हायरिस्क कॅटेगिरीत समावेश केला आहे. त्यामुळं स्पाईसजेटसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे. (IDFC Indian Bank Yes Bank put SpiceJet loans in high risk category)

IDFC Bank, Yes Bank आणि Indian Bank या खासगी कर्ज देणाऱ्या बँकांनी स्पाईसजेट लिमिटेड या कंपनीच्या कर्जांना हायरिस्क कॅटेगिरीत टाकलं आहे. या बँकांना कंपनीच्या कॅशफ्लोबाबत काळजी वाटत आहे. याबाबत बँकांनी स्पाईसजेटकडं खात्री मागितली आहे. तसेच काही विमानं भाड्यानं देण्यातही कंपनी मागे असल्याची चर्चा आहे. दरम्यान, स्पाईसजेटचे शेअर्स ४.८ टक्क्यांनी कोसळल्याची देखील चर्चा आहे.

नक्की काय घडलंय?

या उन्हाळ्यात विमानांच्या सुरक्षेबाबत वारंवार निर्माण झालेले अडथळे आणि भाड्यानं विमान घेणाऱ्या कंपनीकडून चार विमानांची रद्द झालेली नोंदणी यामुळं नियामकांनी स्पाइसजेटचा मंजूर ताफा आठ आठवड्यांसाठी अर्धवट ठेवला होता. या दोन गोष्टींमुळं इंधनाच्या उच्च किंमती आणि अकासा एअर सारख्या नवीन विमान कंपन्यांकडून वाढती स्पर्धा यामुळं एअरलाईनची तरलता आणखी कमी होण्याची चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात स्पाईसजेटच्या कमाईला फटका बसल्यानंतर आत्तापर्यंत कंपनीकडून कोणतीही सकारात्मक बातमी नाही. कंपनीमध्ये उत्साह देखील दिसत नसल्याची चर्चा देखील सुरु आहे.

स्पाईसजेटचं स्पष्टीकरण

दरम्यान, स्पाइसजेटनं बँकांचा दावा खोडून काढताना आपलं कुठलंही बँक खातं हाय अलर्टवर नसल्याचं म्हटलं आहे. कंपनीच्या प्रवक्त्यानं रॉयटर्सला ईमेलद्वारे सांगितलं की, "कर्ज मान्य केलेल्या अटींनुसार दिली गेली आहेत. बँकेनं आमची कर्जे हायरिस्कवर ठेवल्याची आम्हाला माहिती नाही. स्पाइसजेटशी बँकांनी याबाबत कोणताही संवाद केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT