Index Mutual Funds esakal
अर्थविश्व

Index Mutual Fund: कमी जोखीम, कमी खर्च आणि दमदार परतावा

बाजारात अधिक अस्थिरता असेल तर इंडेक्स म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. इंडेक्स म्युच्युअल फंड कमी जोखमीचे आणि कमी किमतीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

शिल्पा गुजर

बाजारात अधिक अस्थिरता असेल तर इंडेक्स म्युच्युअल फंड हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. इंडेक्स म्युच्युअल फंड कमी जोखमीचे आणि कमी किमतीचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

इंडेक्स फंड ही म्युच्युअल फंडामधीलच एक कॅटेगरी आहे. त्यांना निष्क्रिय निधी अर्थात पॅसिव फंड्स म्हणतात. हे फंड्स शेअर बाजाराच्या कोणत्याही निर्देशांकातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात, असे बीपीएन फिनकॅपचे संचालक ए.के. निगम यांनी सांगितले. उदाहरणार्थ, NSE निफ्टी, BSE सेन्सेक्स यांसारख्या निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये फंड मॅनेजर्स पैसे गुंतवतात. अशा फंडांची कामगिरी निर्देशांकासारखीच असते. यामध्ये फंड मॅनेजर पोर्टफोलिओची रचना बदलू शकत नाही. हे फंड सहसा निर्देशांकाच्या कामगिरीपेक्षा चांगला परतावा देतात असेही ते म्हणाले.

जोखीम, खर्च आणि परतावा

इंडेक्स म्युच्युअल फंड हे पॅसिव्हली मॅनेज्ड (Passively Managed) फंड आहेत. त्यामुळे एक्सपेन्स रेश्यो कमी असतो. एक्टिवली मॅनेज्‍ड इक्विटी फंड्सच्या तुलनेत यात कमी अस्थिरता आहे. त्यामुळे इंडेक्स म्युच्युअल फंडातील जोखीमही कमी आहे असे निगम म्हणाले. बाजारातील अस्थिरतेच्या काळात या फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. तथापि, गुंतवणूकदारांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये इंडेक्स फंड आणि मॅनेज्‍ड इक्विटी फंड्स ठेवावेत असा सल्ला दिला जातो.

Tracking Error वर लक्ष द्या

गुंतवणूकदारांनी ट्रॅकिंग एररकडे लक्ष दिले पाहिजे असे निगम म्हणाले. ट्रॅकिंग एरर म्हणजे फंड आणि त्याच्या बेंचमार्कमधील प्रत्यक्ष कामगिरीतील फरक. त्यामुळे, जर एखाद्या इंडेक्स फंडमध्ये खर्चाचे प्रमाण खूप कमी असेल आणि ट्रॅकिंगमध्ये जास्त त्रुटी असतील, तर तो फंड तुमची गुंतवणूक ध्येय पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे, इंडेक्स फंडाच्या गुंतवणूकदारांनी कमीत कमी ट्रॅकिंग त्रुटी असलेल्या योजनांची निवड करावी असा सल्लाही निगम यांनी दिला.

सेबीच्या म्युच्युअल फंड नियमांनुसार, इंडेक्स फंडासाठी एक्सपेंस रेश्यो डेली नेट एसेट 1 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. त्यामुळेच ऍक्टीव्हली मॅनेज्ड फंड्सच्या तुलनेत यामध्ये तरलता अर्थात लिक्विडिटी कमी आहे. तुम्ही त्यांना कधीही विकून नफा मिळवू शकता.

इंडेक्स फंड कोणासाठी चांगला?

ज्या गुंतवणूकदारांना इक्विटीच्या परताव्याचा फायदा घ्यायचा आहे, पण जास्त जोखीम पत्करायची नाही अशांसाठी इंडेक्स फंड अधिक चांगले सोयीचे असल्याची माहिती निगम यांनी दिली. जेव्हा बाजार अस्थिर असतो, तेव्हा या फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. इंडेक्स फंड देखील जोखीममुक्त (Risk Free) नसतात. जर बाजार खाली गेला तर तुमचा इंडेक्स फंड एनएव्हीही खाली जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचे पैसे दुसरीकडे ट्रान्सफर करू शकता.

इंडेक्स फंडाचा फायदा म्हणजे कोणत्याही एका स्टॉकमध्ये पैसे गुंतवण्याऐवजी तो निर्देशांकात समाविष्ट असलेल्या स्टॉक्समध्ये गुंतवला जातो. त्यामुळे पोर्टफोलिओमध्ये विविधता येते. एका कंपनीच्या शेअरमध्ये कमकुवतपणा असेल तर दुसऱ्या कंपनीच्या वाढीतून मिळणारा परतावा संतुलित करता येतो असेही निगम म्हणाले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT