Finance Vertigo3d
अर्थविश्व

वित्तीय तूट वाढली; केंद्र सरकारच्या चिंतेत भर

एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये वित्तीय तूट अर्थात फिस्कल डेफिसिट पूर्ण वर्षाच्या टार्गेटच्या 50.4 टक्के होती.

शिल्पा गुजर

एप्रिल 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान भारताची वित्तीय तूट अर्थात फिस्कल डेफिसिट आर्थिक वर्ष 2022 च्या टारगेटच्या 58.9 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. 28 फेब्रुवारी रोजी कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सने जारी केलेल्या आकडेवारीत हे उघड झाले आहे. एप्रिल-डिसेंबर 2021 मध्ये वित्तीय तूट अर्थात फिस्कल डेफिसिट पूर्ण वर्षाच्या टार्गेटच्या 50.4 टक्के होती. (Indian Economy News Updates)

सरकारची फायनान्सशी संबंधित ताजी आकडेवारी 2022-23 च्या अर्थसंकल्पानंतर आली आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारने म्हटले होते की फिस्कल डेफिसिट ग्रॉस डॉमेस्टिक प्रॉडक्ट (GDP) 6.8 टक्क्यांच्या उद्दिष्टापेक्षा 10 बेसिस पॉइंट जास्त असेल.

अजूनही चांगली स्थिती

फिस्कल डेफिसिट 6.9 टक्के असूनही, चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 9.2 टक्क्यांपर्यंत वाढून गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत असेल. याचे मुख्य कारण म्हणजे कोरोना महामारीशी लढण्यासाठी सरकारने केलेल्या खर्चात वाढ, तसेच कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने सरकारच्या महसुलालाही फटका बसला होता.

सरकारची आर्थिक स्थिती चांगली

सरकारची आर्थिक स्थिती यावर्षी चांगली आहे. आर्थिक वर्ष 2021 च्या पहिल्या 10 महिन्यांत फिस्कल डेफिसिट संपूर्ण वर्षासाठी रिवाइज्ड टार्गेटच्या 66.8 टक्के होती.

अर्थसंकल्प, 2021 मध्ये, आर्थिक वर्ष 2021 साठी फिस्कल डेफिसिट टारगेट 7.96 लाख कोटी रुपयांवरून 18.49 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे खर्च आणि महसुलात झालेली घट लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला होता.

जानेवारी 2022 मध्ये केंद्राने 1.79 लाख कोटी रुपयांची फिस्कल डेफिसिट नोंदवले गेले, जी गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत दुप्पट होती. जानेवारी 2022 मधील फिस्कल डेफिसिट वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्राप्ती 32.1 टक्‍क्‍यांनी कमी झाली आणि खर्चात 21.6 टक्‍क्‍यांनी वाढ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT