ऑनलाइन गेमिंग हा जगभरातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. भारतही या क्षेत्रापासून दूर नाही. भारतात 39.6 कोटी लोक गेम खेळतात. गेमर्सच्या संख्येच्या बाबतीत भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश बनला आहे. आशियातील टॉप 10 देशांमध्ये, 50 टक्क्यांहून अधिक गेमर्स एकट्या भारतात आहेत.
हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?
आशिया-10 गेम्स मार्केट या शीर्षकाच्या अहवालात असे म्हटले आहे की, गेमर्सची संख्या भारतात सर्वात जास्त वाढत आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये महसूल 21 टक्के वार्षिक दराने वाढला आहे. अहवालात असे म्हटले आहे की, कमाईच्या वाढीच्या दरापेक्षा गेमर्सची संख्या वेगाने वाढत आहे. दुसर्या अहवालानुसार, भारताचा गेमिंग बाजार 2022 मध्ये 2.6 अब्ज डॉलर असू शकतो आणि 27 टक्के वाढीसह 2027 मध्ये 8.6 अब्ज डॉलर होण्याचा अंदाज आहे.
अहवालानुसार, भारत, थायलंड आणि फिलीपिन्स हे देश कमाई आणि गेमर्सच्या संख्येच्या बाबतीत वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक आहेत. 10 आशियाई बाजारपेठांमध्ये जपान आणि कोरिया मोठी बाजारपेठ म्हणून गणले जातात आणि 77 टक्के महसूल या दोन देशांमधून येतो.
भारतात गेमर्सची संख्या वाढत आहे, त्यामुळे सरकार यातून उत्पन्न वाढवण्याच्या पर्यायावरही विचार करत आहे. ऑनलाइन गेमिंगवर जीएसटी दर वाढवला जाऊ शकतो. सध्या ऑनलाइन गेमिंगवर 18% टक्के जीएसटी आहे. राज्यांच्या अर्थमंत्र्यांनी ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याची सूचना केली आहे. मंत्रिगटाचा अहवाल लवकरच जीएसटी परिषदेला चर्चेसाठी सादर केला जाऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.