Indian Oil Free Petrol: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. अशा स्थितीत तुम्हाला 50 रुपयांत पेट्रोल आणि डिझेल मोफत मिळू शकते, असे सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही.
पण ही गोष्ट खरी आहे. इंडियन ऑइलच्या हजारो पेट्रोल पंपांवर तुम्ही या ऑफरचा लाभ घेता येऊ शकतो.
या धमाकेदार ऑफरसाठी देशातील लोकप्रिय पेमेंट अॅप PhonePe किंवा Google Pay किंवा Paytm द्वारे IOCL XTRAREWARDS खात्यासाठी नोंदणी करा.
नोंदणीच्या काही वेळानंतर, तुमच्या IOCL XTRAREWARDS खात्यात 50 रुपये येतील. तुम्ही ते 50 रु. वापरून IOCL पंपावर पेट्रोल/डिझेल/गॅस खरेदी करू शकता.
विशेष बाब म्हणजे तुम्ही IOCL XTRAREWARDS कार्यक्रमासाठी फक्त एकदाच मोबाईल नंबरवरून नोंदणी करू शकता.
ऑफरचा अधिक फायदा घेण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या मोबाईल नंबरवर नोंदणी करू शकता. ही ऑफर किती दिवसांची आहे, त्याची माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
PhonePe अॅपवर ऑफरचा लाभ कसा घ्यावा-
PhonePe अॅपच्या प्रोफाइलवर (डावीकडे) जा.
आता All Payment Options वर क्लिक करा.
खाली स्क्रोल करा आणि IOCL XtraRewards वर क्लिक करा, आता लिंक करा.
नोंदणी करण्यासाठी नाव आणि शहराचा पिनकोड टाका.
काही वेळाने XTRAREWARDS खात्यात 50 रुपये येतील
आता रिडीम करण्यासाठी कोणत्याही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर जा.
पेटीएम अॅपवर ऑफरचा लाभ कसा घ्यावा-
पेटीएम अॅपच्या सर्च बारमध्ये आयओसीएल टाइप करा किंवा रिचार्ज आणि बिल पेमेंट्स section मध्ये जा आणि ट्रांझिट सबसेक्शनमध्ये आयओसीएल रिवॉर्ड्स वर क्लिक करा.
XtraRewards प्रोग्राममध्ये नावनोंदणी करण्यासाठी आता नाव, जन्मतारीख आणि शहराचा पिनकोड टाका.
आता तुमचे प्रारंभिक वॉलेट शिल्लक रु.0 असेल पण 5-6 वेळा रिफ्रेश करा आणि तुम्हाला रु.50 मोफत मिळतील.
आता रिडीम करण्यासाठी कोणत्याही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर जा.
गुगल पे अॅपवर ऑफरचा लाभ कसा घ्यावा-
Google Pay अॅप उघडा.
खाली स्क्रोल करा आणि ऑफर्स वर क्लिक करा.
लोकप्रिय ऑफर्स अंतर्गत इंडियन ऑइल वर क्लिक करा.
आता XtraRewards कार्यक्रमात सामील होण्यासाठी नाव, जन्मतारीख, लिंग आणि शहराचा पिनकोड टाका.
काही वेळाने XTRAREWARDS खात्यात 50 रुपये येतील
आता रिडीम करण्यासाठी कोणत्याही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर जा.
XTRAREWARDS म्हणजे काय :
हा इंडियन ऑइलचा लॉयल्टी प्रोग्राम आहे. याद्वारे ग्राहकांना इंडियन ऑइलच्या पेट्रोल स्टेशनवर प्रत्येक खरेदीवर पॉइंट मिळू शकतात. याद्वारे, तुम्ही खर्च केलेल्या प्रत्येक रु.75 साठी 1 पॉइंट मिळवू शकता.
100 पॉइंट रिडीम करून, तुम्ही 30 रुपये शिल्लक मिळवू शकता आणि ते इंधन खरेदीसाठी वापरू शकता. हा लॉयल्टी प्रोग्राम सध्या मुंबई, दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, कोईम्बतूर, म्हैसूर, पुणे आणि सिकंदराबाद येथे सुरु आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.