Share Market sakal media
अर्थविश्व

भारतीय शेअरबाजार निर्देशांक सुमारे दीड टक्का वाढले; सलग पाचवी वाढ

कृष्ण जोशी

मुंबई : अनुकूल जागतिक परिस्थितीमुळे आज भारतीय शेअरबाजार (Indian Share Market) निर्देशांक (coordinates) सुमारे दीड टक्का वाढले. आयटी व बँकांच्या शेअरच्या जोरावर आज सेन्सेक्स (Sensex) ९३५.७२ अंश, तर निफ्टी (Nifty) २४०.८५ अंश वाढला. निर्देशांकांची ही सलग पाचवी वाढ आहे. दिवसअखेरीस ५६,४६८.०२ अंशांवर बंद झाला, तर निफ्टीही १६,८७१.३० अंशांवर स्थिरावला.

आज आशियाई बाजार संमिश्र होते, तर युरोपीय बाजार नफा दाखवत होते, त्यातच कच्च्या तेलाच्या किमतीत किरकोळ घट झाल्याने शेअरबाजारात खरेदी झाली. सुरुवातीला व्यवहार सुरू होताना बाजार किरकोळ घसरले होते, सेन्सेक्स ५५,५५६.४७ पर्यंत घसरला. पण नंतर तेथून तो सतत वर जात राहिला. आज निफ्टीच्या प्रमुख ५० पैकी ३७ शेअरचे भाव वाढले. रिझर्व्ह बँकेने डिजिटल व्यवहारांवरील निर्बंध उठवल्याने एचडीएफसी बँक सव्वातीन टक्के म्हणजे ४५ रुपयांनी वाढून १,४४२ रुपयांपर्यंत गेला; तर रिझर्व्ह बँकेने पेटीएम बँकेवर निर्बंध लादल्याने पेटीएमचा शेअर १०० रुपयांनी घसरून ६७४ रुपयांवर गेला. हा त्याचा सार्वकालिक नीचांक आहे.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी फक्त हिंदुस्थान युनिलीव्हर ३४ रुपयांनी घसरून २,०६० वर आला, तर सनफार्मा (८९२), डॉ. रेड्डीज लॅब (३,९५४) व टाटा स्टील (१,२९७) हे शेअर किरकोळ घसरले. त्याखेरीज उरलेले सर्व २६ प्रमुख शेअर तेजी दाखवत बंद झाले. वाढलेल्या शेअरमध्ये इन्फोसिस (१,८९०), स्टेट बँक (४८५), मारुती (७,३१४), अॅक्सिस बँक (७१०) व आयसीआयसीआय बँक (६९६) हे शेअर अडीच ते पावणेचार टक्के वाढले. विप्रो, एचडीएफसी, टायटन, कोटक बँक, आयटीसी, टीसीएस, लार्सन ॲण्ड टुब्रो, टेक महिंद्र, महिंद्र आणि महिंद्र व एशियन पेंट हे शेअर एक ते दोन टक्के वाढले.

आजचे सोन्या-चांदीचे भाव
सोने - ५२,४७० रु.
चांदी - ७०,००० रु.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT