share market sakal media
अर्थविश्व

निफ्टी 17 हजारांजवळ ; सेन्सेक्स 765 अंशांनी वाढला

- कृष्ण जोशी

मुंबई : जागतिक बाजारपेठांमधील (International market) सकारात्म संकेतांमुळे (positive things) आज भारतीय निर्देशांकांनी (Indian share market) सव्वा टक्क्यांहूनही जास्त भरारी मारली. त्यामुळे निफ्टी (nifty) 17 हजारांजवळ तर सेन्सेक्स (Sensex) 57 हजारांनजिक पोहोचला.

आज धातू उत्पादक कंपन्या तसेच औषधनिर्मिती कंपन्यांचे शेअर वाढल्याने निर्देशांक सर्वकालिक उच्चांकी स्तरावर पोहोचले. अमेरिकी फेड तर्फे अर्थसाह्याबाबत सूचक संकेत देण्यात आल्याने तसेच भारतीय अर्थव्यवस्था उसळी मारण्याच्या अपेक्षेने आज गुंतवणुकदारांनी तुफान खरेदी केली. त्यामुळे 225 अंशांनी वाढून निफ्टी 16,931 अंशांवर पोहोचला. तर 765 अंशांनी वाढलेला सेन्सेक्स दिवसअखेर 56,889 अंशांवर स्थिरावला. आज व्यवहारादरम्यान निफ्टीने 16,951 अंशांचा व सेन्सेक्सने 56,958 अंशांचा उच्चांक नोंदविला होता. त्यामुळे आता लौकरच सेन्सेक्स 57 हजारांचा व निफ्टी 17 हजारांचा टप्पा गाठेल अशी अपेक्षा आहे.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख 30 शेअरपैकी फक्त नेस्ले, टेक महिंद्र, इन्फोसिस व टीसीएस या शेअरचे भाव पडले होते. तर निफ्टी मधील प्रमुख 50 शेअरपैकी फक्त सात शेअरचे (वरील चौघांसह एसबीआय लाईफ, विप्रो, आयशर मोटर्स) भाव पडले होते. उरलेल्या सर्व शेअरचे भाव वाढले. आज सेन्सेक्समधील भारती एअरटेलचा भाव टक्केवारीच्या हिशोबात सर्वात जास्त म्हणजे 4.44 टक्के म्हणजे 26 रुपयांनी वाढून 620 रुपयांवर गेला.

टाटा स्टील 55 रुपयांनी वाढून 1,439 रुपयांपर्यंत गेला. 202 रुपयांनी वाढलेला बजाज फायनान्स 7,165 रुपयांवर तर 43 रुपयांनी वाढून रिलायन्स 2,270 रुपयांवर गेला. बजाज फिनसर्व्हने 16,551 रुपयांचा टप्पा गाठला तर मारुती 6,797 रुपयांवर (191 रुपयांची वाढ) पोहोचला. सन फार्मा (786 रु.), डॉ. रेड्डीज लॅब (4,678 रु.) व लार्सन टुब्रो (1,659) यांच्या दरातही वाढ झाली.

आजचे सोन्याचांदीचे दर

सोने - 47,500 रु.

चांदी - 63,600 रु.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT