Indian Superbrand Soap : इंग्रजांच्या काळात कोलकाता हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. म्हणूनच भारतातील अनेक बड्या व्यापारी घराण्यांची सुरुवात कोलकाता येथे झाली.
त्यांचा बंगालशी काही ना काही संबंध होता. तुम्हाला अशा साबणाच्या ब्रँडबद्दल माहिती आहे का? जो आता 100 वर्षांहून अधिक जुना आहे. पण त्याची जादू अजूनही संपलेली नाही.
त्या साबणाच नावं मार्गो साबण आहे. तोच साबण ज्यामध्ये कडुलिंबाच्या कडूपणामुळे मुलांना आंघोळ करायला आवडत नाही. पण कडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे त्याचा वापर वाढतो.
100 वर्षांपूर्वी कडुनिंबामुळे या साबणाने आपली खास ओळख निर्माण केली आणि तो एक मोठा भारतीय ब्रँड (Indian Superbrands Story) बनला आहे.
मार्गो साबण हे भारतातील स्वदेशी चळवळीचे उत्पादन आहे. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात भारतीय बाजारपेठा इंग्रजी मालाने भरलेल्या होत्या. त्यानंतर 1916 मध्ये खगेंद्र चंद्र दास (K. C. Das) यांनी आपल्या दोन सहकाऱ्यांसह कलकत्ता केमिकल कंपनीची स्थापना केली.
दास यांनी 1910 मध्ये अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी घेतली. त्यानंतर काही काळ जपानलाही जाऊन त्यांनी औषधनिर्माणशास्त्राचे शिक्षण घेतले.
हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक
ते स्वतः वैद्य कुटुंबातून आलेले. भारतात परतल्यावर ते ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या स्वदेशी चळवळीचा एक भाग बनले आणि या कंपनीचा पाया रचला गेला.
कडुनिंब म्हणजे भारताची ओळख :
दास यांनी कडुनिंब ही भारताची ओळख मानली. रसायनशास्त्रातील त्यांच्या पदवीमुळे त्यांना कडुलिंबाचा चांगला अर्क काढण्यास मदत झाली. त्यांनी भारताची ही ओळख म्हणजे कडुलिंबाचे साबणामध्ये रूपांतर केले आणि 1920 मध्ये मार्गो साबण अस्तित्वात आला. यासोबतच त्यांनी नीम टूथपेस्टही बनवली.
त्या काळात, त्याचे आणखी एक उत्पादन खूप लोकप्रिय झाले, त्याचे नाव लॅव्हेंडर ड्यू पावडर. नंतर त्यांच्या कंपनीने अरामस्क साबण, चेक डिटर्जंट, महाभृंगराज तेल अशी इतर उत्पादनेही बनवली.
अशा प्रकारे मार्गो साबण प्रत्येक घरात पोहोचला :
दास यांनी मार्गो साबणाची किंमत अशा प्रकारे निश्चित केली की, समाजातील प्रत्येक घटक ते विकत घेऊ शकेल. त्यामुळेच हा साबण देशभर लोकप्रिय झाला. त्यानंतर काही वर्षांत कंपनीला तामिळनाडूमध्येही आपले उत्पादन युनिट उघडावे लागले.
मार्गो 1988 मध्ये भारतीय बाजारपेठेत इतका लोकप्रिय झाला की, हेंकेल कंपनीने हा ब्रँड 75 कोटी रुपयांना विकत घेतला.
2011 मध्ये ज्योती लॅबोरेटरीजने या ब्रँडशी संबंधित सर्व अधिकार मिळवले. आता साबणाशिवाय कंपनीने मार्गो ब्रँड नावाने फेसवॉश, हँडवॉश आणि सॅनिटायझर देखील बनवते. तर नीम टूथपेस्ट आता नीम अॅक्टिव्ह या ब्रँड नावाने विकली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.