Travel Insurance for Senior Citizens: आजकाल लोक तरूणपणी काम करण्याचा आणि रिटायरमेंटनंतर देश भ्रमंती करण्याचा प्लॅन करतात. खरं तर असं करणं आर्थिक दृष्ट्या फायद्याचं ठरतं. कारण, निवृत्तीनंतर आपण जबाबदाऱ्यांतून मोकळे झालेलो असतो. त्यामुळे आर्थिक बाजू सांभाळत जोडीदार, मित्रांसोबत ट्रॅव्हल करण्याची मजाच काही और असते. (Travel Insurance for Senior Citizens)
तुम्ही एकटे गेलात किंवा कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीकडून तूम्हाला स्वत:ची काळजी घ्यावी लागते. कारण, निवृत्तीनंतर वेळ, पैसा असला तरी आरोग्य, शरीर साथ देत नसतं. बऱ्याचवेळा प्रवासाने त्रास होतो आणि लोकांना घरी परतल्यावरही त्याचा त्रास होतो. काहीवेळा काही अपघात होतो. तर वस्तू चोरीला जाते त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.
अलीकडच्या काळात प्रवासी विमा घेण्याचा कल वाढला आहे. प्रवासाशी संबंधित जोखमींमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितींविरूद्ध विमा एक ढाल म्हणून काम करतो. देशांतर्गत किंवा परदेशात प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी विमा पॉलिसी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आणि अशा प्रकारे त्यांना आरामदायी आणि चिंतामुक्त प्रवासाचा अनुभव प्रदान करतो.
काय आहे जेष्ठांसाठीचा प्रवासी विमा
60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आणि त्यांच्या प्रवासाच्या योजनांसाठी हा विमा आहे. प्रवास विमा कंपन्या अशा पॉलिसी प्रदान करतात ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करू शकतात. तसेच त्याच्या आरोग्याशी संबंधित जोखमींची काळजी घेऊ शकतात.
या विमा योजनेत वृद्धांना आधीच असलेल्या आजारांची काळजी घेते. तर त्यासाठी वैद्यकीय लाभ पुरवतात. यामध्ये डॉक्टरांची व्हिजीट, सामानाचे नुकसान, रुग्णवाहिका सेवा, अतिदक्षता उपचार, शस्त्रक्रिया उपचार आणि बरेच काही समाविष्ट आहे.
तुम्ही ज्येष्ठ नागरिक प्रवास विमा का निवडला पाहिजे?
जर कोणत्याही अपरिहार्य कारणामुळे तुम्ही ठरवलेला प्रवास हा तुम्हाला रद्द करावा लागला तर तुमच्या ‘प्रवास विमा’ मधून तुम्हाला ते पैसे परत मिळत असतात. तुमच्या प्रवासाच्या २४ तास आधीपर्यंत फक्त तुम्ही प्रवास रद्द करण्याची सूचना प्रवास करणाऱ्या कंपनीला किंवा तुम्ही ‘प्रवास विमा’ विकत घेतलेल्या कंपनीला दिली पाहिजे.
तुम्ही करत असलेल्या प्रवासादरम्यान जर तुम्हाला हृदयविकार, दमा किंवा तत्सम एखाद्या आजाराची लक्षणं दिसली तर तुमच्या ‘प्रवास विमा’ कंपनी तुमच्या इलाजासाठी लागणारी आर्थिक मदत करत असते.
तुम्ही निवडलेल्या विम्याच्या रकमेनुसार तुम्हाला डॉक्टरची फि, हॉस्पिटलमध्ये रहाण्याचा खर्च, औषधांचा खर्च ही सर्व तुम्हाला विमा असल्यास सहज मिळू शकतो. सध्या कित्येक ‘प्रवास विमा’ कंपन्यांनी प्रवासात कोरोना झाल्यास त्याच्या उपचाराचा खर्च देण्यास सुद्धा सुरुवात केली आहे. (Marathi Tajya Batmya)
तुम्ही करत असलेल्या प्रवासा दरम्यान जर काही कारणांमुळे तुमचा पासपोर्ट, लॅपटॉप किंवा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना हरवला किंवा तुमची बॅग किंवा पाकीट चोरीला गेलं तर ‘प्रवास विमा’ कंपनी ही तुम्हाला तात्काळ लागणारी आर्थिक मदत करण्यास बांधील असते.
तुमचा ‘प्रवास विमा’ निवडताना फक्त तुम्ही या सर्व शक्यतांबद्दल तुमच्या विमा प्रतिनिधी सोबत चर्चा केली पाहिजे. तुम्ही ज्या गावाला, राज्यात किंवा देशात जाण्यासाठी प्रवास करत आहात तिथे जर दंगल झाली किंवा संचारबंदी लागू झाली किंवा तिथे वादळ, भूकंप आला तर तुमचा खर्च ‘प्रवास विमा’ कंपनी करत असते. (Latest Marathi News)
तुमच्या ‘प्रवास विमा’ मध्ये तुमच्या घरी परत येण्याच्या तिकिटासाठी लागणारे पैसे सुद्धा विम्यातून वळते करण्याची सोय सध्या उपलब्ध आहे.
या गोष्टीकडे लक्ष द्या
विम्याची रक्कम
बर्याच विमा कंपन्या विविध कव्हरेजसाठी विम्याच्या रकमेचा संपूर्ण ब्रेकअप देतात. विमा कंपन्या वैद्यकीय खर्चासाठी मर्यादा सेट करू शकतात. किंवा वेगवेगळ्या आजारासाठी वेगळी मर्यादा सेट करू शकतात.
पूर्वीपासून अस्तित्वात असलेले आजार
ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास विमा खरेदी करताना लक्षात ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योजना सर्व प्रकारच्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांना कव्हर करते.
मेडिकल टेस्ट्स
अशा काही योजना असू शकतात ज्यात असे सर्वसमावेशक कव्हरेज उपलब्ध नाही. तर काही कंपन्या गंभीर आजारासाठी लागणाऱ्या मेडीकल टेस्ट करण्यास सांगू शकतात. त्यामुळे तुमच्या आजारांची माहिती कंपनीला मिळू शकते.
प्रवासी विम्यात या गोष्टी येत नाहीत
जीवघेणा रोग पूर्व-अस्तित्वात असलेल्या रोगांच्या अंतर्गत समाविष्ट नाही.
जर विमाधारकाने आत्महत्या केल्यास विम्याचे पैसे मिळत नाहीत.
जर विमाधारक व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याविरुद्ध प्रवास केला.
दारू, ड्रग्ज किंवा इतर मादक पदार्थांच्या सेवनामुळे होणारे नुकसान
विमाधारक व्यक्तीचा बेकायदेशीर कामांमध्ये सहभाग असल्यास जीवाचा काही नुकसान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.