Share Market Sakal media
अर्थविश्व

सेन्सेक्स 145 अंशांनी वधारला; तर निफ्टी प्रथमच साडेसोळा हजारांवर

कृष्ण जोशी

मुंबई : जागतिक बाजारांमधील (international market) प्रतिकूल वातावरणानंतरही भारतीय निर्देशांकांनी (share market) आपली आगेकूच आजही कायम ठेवली. सेन्सेक्स 145 (Sensex) अंशांनी तर निफ्टी (nifty) 33 अंशांनी वाढला. निफ्टीने आज प्रथमच साडेसोळा हजारांचा टप्पा गाठला. आज जागतिक बाजारांमध्ये प्रतिकूल वातावरण होते, त्यामुळे निर्देशांकांना फार मोठी भरारी मारता आली नाही. तरीही निफ्टीने साडेसोळा हजारांवर मजल मारली व तो दिवसअखेरीस 16,563 अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्सही 55,582 अंशांवर बंद झाला.

टक्केवारीच्या हिशोबात टाटा स्टील सुमारे चार टक्के म्हणजे 57 रुपयांनी वाढून 1,519 रुपयांवर गेला. तर 224 रुपयांनी वाढलेला बजाज फायनान्स 6,376 रुपयांवर बंद झाला. महिंद्र आणि महिंद्रही (बंद भाव 799 रु.) 20 रुपयांनी वाढला. बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, हिंदुस्थान युनिलीव्हर, एचडीएफसी यांच्या दरातही एक ते पावणेदोन टक्का वाढ झाली. दुसरीकडे मारुती 170 रुपयांनी घटून 6,828 रुपयांपर्यंत घसरला. 78 रुपयांनी घसरलेला बजाज ऑटो 3,748 रुपयांपर्यंत खाली आला. स्टेट बँक, लार्सन टुब्रो (1,656), एअरटेल (633), इन्फोसिस (1,704) यांच्या दरांमध्ये घसरण झाली.

आशियाई बाजारांत घसरण

आशियाई देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तसेच अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य आल्याने आज चिंतेचे वातावरण होते. त्यामुळे आशिया-ऑस्ट्रेलियाच्या शेअर बाजारांमध्ये घसरण झाली. जपानचा निक्की निर्देशांक सुमारे दोन टक्के घसरला. तर ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग व शांघाय येथील शेअर बाजारही कोलमडले. जपान, थायलँड व मलेशिया येथे मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, व्हिएटनाम व फिलिपाईन्स येथील रुग्णांची संख्याही वाढत असल्याने तो चिंतेचा विषय झाला आहे. अफगाणिस्तानातील अस्थैर्याचे आशियावर काय परिणाम होतील ही चिंताही सर्वत्र असल्याने त्याचा परिणाम बाजारांवर झाला.

आजचे सोन्याचांदीचे दर

सोने - 46,980

चांदी - 62,700

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT