Mutual Fund बाबत तुम्हाला माहितच असेल. म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा अप्रत्यक्ष पर्याय आहे. आपल्या फंडाला किंवा गुंतवणूकीला म्युच्युअल फंड कंपनी योग्य ठिकाणी मॅनेज करत असते. म्युच्युअल फंड कंपनी गुंतवणूकधारकांकडून पैसे गोळा करते, अन् ती रकम वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये गुंतवते. यामध्ये शेयर बाजार, बॉन्ड बाजार, मनी मार्केट इंस्ट्रूमेंट आणि सोन्याचा समावेश आहे. जर तुम्हाला गुंतवणुकीवर मोठी रिटर्न पाहिे असल्यास म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड मार्फत तुम्ही कमी कालावधीत मोठी रकम कमवू शकतात. एफडी किंवा पोस्ट ऑफिसच्या योजनापेक्षा इथं जास्त रकम मिळते. जाणून घेऊयात २०२१ मधील म्युच्युअल फंडमधील तीन महत्वाच्या स्कीमबद्दल... ज्याद्वारे तुम्हाला वर्षभरातच मोठी रकम मिळेल. हे तिन्हीही फंड शेअर बाजाराशी जोडले गेले आहेत. तिन्ही फंडानं गुंतवणूकधारकांना आतापर्यंत चांगलं रिटर्न दिलं आहे. इक्विटी फंडांमध्ये तुमचे पैसे स्टॉक्समध्ये गुंतवले जातात.. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार तेजीत आहे. गुंतवणुकधारकांनी येथे चांगली कमाई केली. यंदा Mirae Asset Tax Saver Fund ने सर्वाधिक रिटर्न दिलं आहे. यामध्ये कमीत कमी ५०० रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते. ही SIP (Systematic Investment Plan) किंवा एकमुश्त (Lumpsum) रकम असू शकते.
Mirae Asset Tax Saver Fund -
२०१५ मध्ये Mirae Asset Tax Saver Fund याला लाँच करण्यात आलं आहे. गेल्या सहा वर्षांत Mirae Asset Tax Saver Fund सरासरी २२ टक्केंनी रिटर्न दिलं आहे. गेल्यावर्षभरत Mirae Asset Tax Saver Fund ने ६६ टक्के, गेल्या तीन महिन्यात १५.५ टक्के, गेल्या सहा महिन्यात ३७ टक्के आणि वर्षभरात जास्तीत जास्त १०४ टक्के रिटर्न दिलं आहे. वर्षभरातील सरासरी रिटर्न ६६ टक्के इतकं आहे. या फंडाचे रिटर्न्सपासून वर्षभरात तुमचे पैसे दुप्पट होतील.
वर्षभरात १०४ टक्के रिटर्न -
Quant Tax Plan ने गेल्या वर्षभरात १०४ टक्के रिटर्न दिलं आहे. गेल्या तीन महिन्यात Quant Tax Plan ने २० टक्केंपर्यंत, सहा महिन्यात ४३ टक्केंपर्यंत रिटर्न दिलं आहे. या सर्वांचा विचार करुन गुंतवणूक करत असाल तर वर्षभरात रकम दुप्पट होईल. यामध्ये कमित कमी ५०० एकमुश्त किंवा SIP करु शकता.
कमीत कमी १००० SIP -
Mirae Asset Emerging Bluechip Fund हा जवळपास ८ वर्ष जुना म्यूचुअल फंड आहे. यामध्ये कमीत कमी १००० SIP करावं लागतं. गेल्या तीन महिन्यात यानं १८ टक्के, सहा महिन्यात ४४ टक्केंपर्यंत आणि वर्षभरात ६३ टक्के रिटर्न दिलं आहे.
(प्राथमिक माहितीच्या आधारावर बातमी/लेख प्रकाशित करण्यात आला आहे. यामधील मतांशी 'सकाळ ऑनलाइन' सहमत असेल असे नाही. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या...)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.