आपण सर्व भारतीयांना सिंगापूर या लहानश्या देशाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. तिथले स्वच्छ रस्ते, तिथले नियम आणि तिथली शिस्त आपल्या सर्वांना कायम भावते. प्रत्येकाला सिंगापूरमध्ये एकदा तरी फिरायला जाता यावं असं कायम वाटतं. सिंगापूरसारखा लहानसा देश तिथल्या पर्यटनामुळे आणि सिंगापूरचं सरकार (Singapore Government) त्यांच्या देशाला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करते. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंगापूर सरकारमार्फत केली जाणारी गुंतवणूक. कदाचित तुम्हाला माहित नसेल, पण सिंगापूर सरकार थेट भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) गुंतवणूक करते. वाचून आश्चर्य वाटलं ना? हो ! हे खरं आहे. (investing portfolio of government of Singapore in Indian stock market)
सिंगापूर सरकार थेट भारतीत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवते. भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थांची किंवा इतर देशांच्या सरकारांनी गुंतवणुक करावी म्हणून एक खास गट केलेला आहे. त्याला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स म्हणजे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार असं संबोधलं जातं. परदेशी गुंतवणूकदारांमुळेच आणि तिथल्या आर्थिक परिस्थितीमुळे भारतीय शेअर बाजारात तेजी किंवा मंदी येत असते. याच विकल्पाअंतर्गत सिंगापूर सरकार थेट भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय बाजारपेठेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वात जास्त 'नेट वर्थ' असणाऱ्या गुंतवणूकदारांपैकी सिंगापूर सरकार एक आहे. 21 मे 2021 पर्यंत सिंगापूर सरकारने भारतीय शेअर बाजारातील विविध शेअर्समध्ये तब्ब्ल 86 हजार करोड रुपयांची गुंतवणूक केली आहे.
कोणते आहेत 5 महत्त्वाचे शेअर्स जिथे सिंगापूर सरकारने केलीये बक्कळ गुंतवणूक
Anant Raj Limited | अनंत राज लिमिटेड - अनंत राज लिमिटेड ही एक रियल इस्टेट संबंधित भारतीय शेअर बाजारातील लिस्टेड स्मॉल कॅप कंपनी आहे. या कंपनीत सिंगापूर सरकारने स्वतःची 4.20 टक्के हिस्सेदारी ठेवली आहे.
HIndalco | हिंडाल्को - हिंडाल्को या शेअरमध्ये 31 मार्च 2021 पर्यंत सिंगापूर सरकारची तब्ब्ल 3 टक्के हिस्सेदारी आहे. अँल्युमिनिअम आणि अल्ल्युमिनिअम संबंधित वस्तू तसेच तांबं आणि त्या संबंधित वस्तूंशी निगडित व्यवसाय करणारी ही कंपनी आहे. मेटल्स सेक्टरमधील आलेल्या तेजीमुळे या देखील कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी आलेली आपण पहिली आहे. कमोडिटी मार्केटमध्ये एक सुपर सायकल आल्याचं बोललं जातंय. अशात येत्या काळातही या कंपनीच्या शेअरमध्ये चांगली तेजी अनुभवायला मिळू शकते असं तज्ज्ञ सांगतात. आणि नुकत्याच आलेल्या तेजीमुळे सिंगापूर सरकारला देखील त्याचा नक्कीच फायदा झाला असेल.
Happiest Minds Technologies Ltd. | हॅप्पीएस्ट माईंड - हॅप्पीएस्ट माईंड ही एक IT आणि डिजिटल सोल्युशन्स देणारी कंपनी आहे. 31 मार्च 2021 पर्यंत सिंगापूर सरकारची या कंपनी 2.57 टक्क्यांची हिस्सेदारी होती.
Tata Motors DVR | टाटा मोटर्स डीव्हीआर - टाटा मोटर्स डीव्हीआर या कंपनीत 31 मार्च 2021 पर्यंत सिंगापूर सरकारची 2.13 टक्के हिस्सेदारी आहे.
MPS Ltd. | एमपीएस लिमिटेड - एम पी एस लिमिटेड ही देखील एक स्मॉल कॅप कंपनी आहे. ही कंपनी मुख्यत्त्वे कम्युनिकेशन सर्व्हिसेस आपल्या ग्राहकांना देते. सिंगापूर सरकारची या देखील कंपनीत 2.08 टक्के हिस्सेदारी आहे. होस्टिंग, कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, इ लर्निंग सोल्युशन्स, कन्टेन्ट सोल्युशन्स अशा प्रकारच्या सुविधा कंपनी देत असते. या कंपनीचा मुख्य महसूल अमेरिका आणि युरोपातून येतो.
या शिवाय रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, बजाज फायनान्स, HDFC, ICICI बँक, भारती एअरटेल, लार्सन्स अँड टुब्रो (L&T) , पावरग्रीड कॉर्पोरेशन, SBI लाईफ इंश्युरन्स, डॉक्टर रेड्डी, अंबुजा सिमेंट, ग्लॅन्ड फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, गोदरेज प्रॉपर्टी, पेट्रोनेट LNG, फिनिक्स मिल्स, IRCTC, प्रेस्टिज इस्टेट्स, AU स्मॉल फायनान्स, IRB, बर्गर किंग या आणि या सारख्या अनेक कंपन्यांमध्ये सिंगापूर सरकारची गुंतवणूक आहे.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.