मुंबई : शेअर बाजारात (share market) गेल्या महिन्यापासून आलेल्या जोरदार तेजीचा सकारात्मक परिणाम म्युच्युअल फंडातील (mutual fund) गुंतवणुकीवरदेखील होत आहे. त्यामुळे जुलै महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडात तब्बल २२,५८३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे जून २०२१ मध्ये ५९८८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. जूनच्या तुलनेत जुलैमध्ये गुंतवणुकीचा ओघ मोठ्या प्रमाणात वाढल्याचे असोसिएशन आॅफ म्युच्युअल फंडस इन इंडिया अर्थात ‘ॲम्फी’च्या आकडेवारीवरून दिसून येते. (Investment flow in equity mutual funds)
शेअर बाजारातील तेजीमुळे कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीबरोबरच (आयपीओ) म्युच्युअल फंडाच्या नव्या फंड योजनाही (एनएफओ) मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत. त्याचा मोठा परिणाम म्युच्युअल फंडातील गुंतवणूक वाढण्यात होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात आलेल्या चार नव्या ‘एनएफओं’च्या माध्यमातून एकूण १३,७०९ कोटी रुपये बाजारात आले. त्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप फंड या एकाच योजनेतून सुमारे १० हजार कोटी रुपये जमा झाले होते. टॅक्स सेव्हिंग योजना आणि व्हॅल्यू फंड वगळता अन्य सर्व इक्विटी फंडात गुंतवणुकीचा ओघ दिसून आळा. सलग पाचव्या महिन्यात इक्विटी फंडातील गुंतवणुकीत पैशाचा ओघ सुरू आहे.
शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडांकडे आकर्षित होत आहेत. म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण व्यवस्थापनाखलील मालमत्ता (एयूएम) जुलै २०२१ अखेरीस ३५.३ लाख कोटी रुपयांवर पोचली, जी जून २०२१ अखेरीस ३३.६ लाख कोटी रुपयांवर होती, अशी माहिती ‘ॲम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. वेंकटेश यांनी दिली.
‘एसआयपी’द्वारे उच्चांकी गुंतवणूक
‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढत चालले असून, जूनमधील ४.०२ कोटी एसआयपी खात्यांच्या तुलनेत जुलैमधील आकडा ४.१७ कोटींवर पोचला. ‘एसआयपी’च्या माध्यमातून जुलैमध्ये ९६०९ कोटी रुपयांचे गुंतवणुकीत योगदान झाले. ‘एसआयपी’च्या माध्यमातून आजवर झालेली ही उच्चांकी गुंतवणूक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.