investment for child future esakal
अर्थविश्व

Investment Tips : १९ व्या वर्षीच पोराला करोडपती बनवायचंय? मग आताच हे काम करा!

investment for child future: मुलांसाठी केलेली ही एक बचत त्यांच भविष्य सुंदर बनवेल

Pooja Karande-Kadam

Investment for Child Future: आजकाल सर्वसामान्य व्यक्तीही स्वप्न पाहु लागलाय. स्वत:च आयुष्य कसं का गेलं असेना पण माझ्या पोरानं मात्र कारमधूनच फिरलं पाहिजे, असं त्यांना वाटू लागलंय. त्यांच्या मुलांकडून फारशा अपेक्षाही नाहीत. कारण सामान्य व्यक्ती स्वत: मुलांसाठी भविष्याची जोडणा करून ठेऊ लागलाय.

आपल्या पोरांन करोडपती व्हावं, यश मिळवाव असं प्रत्येकाला वाटतं. आता सामान्य व्यक्तीचं हेच स्वप्न पुर्ण होणार आहे. यासाठी सरकारनेच पुढाकार घेतला आहे. भारत सरकारच्या पोस्ट खात्याने एक स्कीम आणली आहे. ज्यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी अल्पवयातच करोडपती होऊ शकते.

या स्कीमचे नाव पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड (Public Provident Fund) ज्याला मराठीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी असे देखील म्हटले जाते. हा एक दीर्घ कालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आकर्षक व्याजदर सोबतच गुंतवणुकीवर उत्तम परतावा देते.

पीपीएफ ही योजना 1968 मध्ये अस्तित्वात आली. आणि त्या नंतर आज पर्यंत ही योजना सर्व सामान्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरली आहे.

पीपीएफ मध्ये गुंतवलेला पैसा हा सरकारच्या पाठिंब्यामुळे एकदम सुरक्षित असतो. या शिवाय यात मिळणारा व्याज (interest) आणि परतावा (returns) हे आयकर कायद्या कलम 80C (Income Tax Act under Section 80C) च्या अंतर्गत खाते धारकाला टॅक्स पासून सूट मिळते. म्हणजे मिळणाऱ्या रिटर्न्स वर कुठल्याही प्रकारचे टॅक्स द्यावे लागत नाही.

तुम्ही पीपीएफ खाते एकतर पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकता. तसेच आजकाल काही खाजगी बँका देखील ही सुविधा देत आहेत. भारतातील कोणताही नागरिक पीपीएफ अकाउंट किंवा खाते उघडू शकतो व गुंतवणूक करू शकतो. तसेच अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने सुद्धा खाते उघडता येऊ शकते.

मित्रांनो, पीपीएफ खाते हे फक्त 100 रुपये देऊन उघडता येते. तसेच पीपीएफ खाते दर वर्षी कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जात 1.5 लाख रुपये गुंतवणूक करण्यास परवानगी देते.

आता असं असताना, तूम्ही जर 2 वर्षाच्या मुलाच्या नावाने PPF खाते उघडले. तो 19 वर्षांचा होईपर्यंत, तुम्ही त्या मुलाच्या खात्यात 17 वर्षांत सुमारे ₹ 26 लाख जमा केले असतील. मूल 19 वर्षांचे झाल्यावर तुम्हाला 54.3 लाख रुपये मिळतील.

जर तुम्ही पीपीएफ खात्यात दरमहा २५ हजार रुपये जमा केले तर वयाच्या १९ व्या वर्षी तुमचा मुलगा करोडपती होईल. 17 वर्षांनंतर तुम्हाला या रकमेतून 1.1 कोटी रुपये मिळतील.

करात मिळते सूट

तुम्ही दरवर्षी 1.5 लाख रुपये टाकून तुमच्या income tax वर सूट मिळवू शकता. तुम्ही PPF खात्यात वार्षिक 1.5 लाख रुपयांहून अधिक रक्कम देखील टाकू शकता, परंतु तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत केवळ 1.5 लाखांच्या रकमेवरच कर सूट मिळू शकते.

PPF बद्दल काही महत्त्वाच

  • पीपीएफ खात्याचा कालावधी हा किमान 15 वर्षाचा असतो.

  • मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याआधी खाते बंद केले जाऊ शकत नाही.

  • मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि आजारासाठी पीपीएफ खाते वेळे आधी बंद केले जाऊ शकते.

  • या शिवाय जर खाते धारकाच्या निवासी स्थितीत बदल झाला असल्यास पीपीएफ खाते मॅच्युरिटी आधी बंद केले जाऊ शकते.

  • फक्त यात पहिले 5 वर्षे पीपीएफ खाते बंद करता येणार नाही.

  • पीपीएफ खाते धारकाचा खाते मॅच्युरिटी होण्याआधीच जर मृत्यू झाला. नॉमिनी असलेली व्यक्ती खात्यातील पूर्ण रक्कम काढू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT