Investment Tips Sakal
अर्थविश्व

Investment Tips : SIP मधील गुंतवणूक वाढवावी की गृहकर्ज फेडावे? काय करणे योग्य राहील; जाणून घ्या

दोन्हीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय जरी वैयक्तिक असला तरीही काही गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Investment Tips : गृहकर्ज घेणे किंवा म्युच्युअल फंड एसआयपी सुरू करणे हे दोन्ही वैयक्तिक आर्थिक निर्णय आहेत. ते वैयक्तिक गरजांवर आधारित असतात. SIP द्वारे, तुम्ही नियमित अंतराने थोड्या प्रमाणात मासिक गुंतवणूक सुरू करू शकता.

काही काळानंतर ते जमा होईल आणि मोठ्या रकमेत रूपांतरित होतील. जे भविष्यात आपल्या गरजा पूर्ण करू शकतील.

याउलट गृहकर्ज घेतले तर त्याचेही फायदे आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या स्वप्नातील घर खरेदी करणे, कर वाचवणे, तुमची क्रेडिट मर्यादा वाढवणे, मालमत्ता वाढवणे आणि भाड्यात बचत करणे.

आर्थिक सल्लागारांवर विश्वास ठेवायचा असल्यास, तुम्ही साधारणपणे वार्षिक आधारावर तुमची SIP किमान 10% वाढवावी. तुमची SIP वाढवून, तुम्ही फक्त महागाई पासून बचाव करत नाही, तर तुम्ही आर्थिक उद्दिष्टांकडेही वेगाने पुढे जाता.

येत्या काही महिन्यांत, जेव्हा तुमच्या पगारात वाढ होईल तेव्हा यापैकी कशात अधिक पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरेल हे आपण पाहू.

हेही वाचा : ...इथं बनतो आपला लाडका तिरंगा

तज्ञ काय म्हणतात :

मिंटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखात, फिंटूचे संस्थापक सीए मनीष पी. हिंगर म्हणतात की, दोन्हीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय जरी वैयक्तिक असला तरीही काही गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो.

ते उदाहरणासह स्पष्ट करतात की, समजा तुम्ही 20 वर्षांसाठी 8.5% व्याजाने 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमचा मासिक EMI रुपये 43,391 असेल आणि तुम्ही एकूण 54,13,897 रुपये व्याज द्याल.

तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढीच्या अनुषंगाने तुमचा EMI दर वर्षी 5% ने वाढवण्याचा विचार करा, हे तुम्हाला व्याज खर्चावर ₹19.5 लाखांपर्यंत बचत करण्यास मदत करेल. तुमच्या कर्जाचा कालावधी सुमारे 7.5 वर्षांनी कमी होईल.

तसेच, प्राप्तिकर नियमांनुसार, तुम्ही एका आर्थिक वर्षात भरलेल्या मूळ रकमेवर कलम 80C अंतर्गत ₹1.5 लाखांपर्यंतच्या कर कपातीचा दावा करू शकता. तसेच, कलम 24(b) अंतर्गत, तुम्ही व्याजाच्या रकमेवर ₹ 2 लाखांपर्यंतच्या कपातीचा दावा करू शकता.

SIP चे फायदे :

समजा, तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात 20 वर्षांसाठी दरमहा रु 40,000 ची SIP सुरू केली आहे. यावर 12% चा CAGR गृहीत धरून, तुम्ही तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढीसह SIP मधील गुंतवणूक 5% ने वाढवण्याचा निर्णय घेता.

त्यानंतर 20 वर्षांनंतर तुम्ही ₹ 5,49,50,493 चा कॉर्पस करू शकाल. म्हणजे तुम्हाला ₹ 1,58,71,658 च्या गुंतवणुकीवर ₹ 3,90,78,835 चा नफा होऊ शकतो. जर तुम्ही 5 टक्के वाढ केली नाही, तर हा नफा फक्त ₹ 3,03,65,917 लाख होईल.

यामुळे तुमच्या एकूण नफ्यात रु. 87,12,918 चे नुकसान होईल. आता तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला तुमची गुंतवणूक कुठे वाढवायची आहे.

नोंद : कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT