अर्थविश्व

Investment Tips : तुमच्याकडे असलेल्या पैशांची गुंतवणूक कशी कराल ; जाणून घ्या कुठे मिळेल बेस्ट रिटर्न्स

सहसा लोक एफडीमध्ये पैसे गुंतवतात

सकाळ डिजिटल टीम

Investment Tips : नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून महिनाखर्च भागत नाही. तेव्हा एखादा जोडधंदा असावा असे वाटते. पण, ते शक्य नसते. त्यामुळे लोक गुंतवणूकीतून पैसा कमावण्याचा विचार करतात. सहसा लोक एफडीमध्ये पैसे गुंतवतात. ही एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. पण आजच्या काळात तुमच्याकडे एफडी व्यतिरिक्त अनेक पर्याय आहेत. जेथे तुम्ही गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवू शकता.

लोकांना गुंतवणुकीचे पर्याय माहिती आहेत पण त्यात असलेल्या जोखीमीमुळे गुंतवणूक करायला घाबरतात. कोरोनानंतर लोकांमध्ये गुंतवणुकीबाबत सतर्कता वाढली आहे. नुकताच जागतिक बचत दिन पार पडला. त्याच पार्शभुमीवर गुंतवणूक कशी करावी?, कुठे करावी, त्यातून फायदा किती होईल या गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

गुंतवणुकीचे फायदे काय आहेत

गुंतवणूक केल्याने अनावश्यक खर्च टाळता येतो. गुंतवणूक योग्य वेळी केली तर भविष्यात आपण मोठी स्वप्न पूर्ण करता येतात. गुंतवणूक करताना ती योग्यवेळी केल्यास भविष्य आनंदी अणि सुरक्षित होईल. आपल्या आणि आपल्या मुलांच्या पुढील शिक्षण,व्यवसाय, तसेच सुखी कुटुंबासाठी आपल्याला गुंतवणुकीमुळे मदत होते. गुंतवणुकीमुळे आर्थिक बचत करण्याची सवय लागते.

रियल एस्टेट इंवेस्टमेंट ट्रस्ट

तुमच्याकडे 5 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम असेल. आणि ती तूम्ही ती गुंतवण्याचा विचार करत असाल तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (REIT) हा बेस्ट ऑप्शन आहे. ही म्युच्युअल फंडसारखीच गुंतवणूक असून यामध्ये प्रॉपर्टीवर तूमचे पैसे गुंतवू शकता. यामध्ये सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेऊन मॉल्स, पार्क अशा मोठ्या मालमत्ता खरेदी केल्या जातात.

कशी कराल गुंतवणूक

REIT मध्ये गुंतवणूक करण्यासाठी, तुमच्याकडे फक्त डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते असणे आवश्यक आहे. गुंतवणुकदार म्हणून तुम्हाला लाभांश आणि आरईआयटीच्या वाढीव किमतीच्या रूपात कमाई होईल. ही गुंतवणूक करताना तूम्हाला खात्री असलेल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करा एकदा तुम्ही पाहिले की मूळ मालमत्ता चांगली असली पाहिजे, तरच तुम्हाला फायदा मिळेल.

इंडेक्‍स फंड्स

इक्विटी म्युच्युअल फंडावर आधारित अप्रत्यक्ष गुंतवणुकीचा मार्ग म्हणजे इंडेक्स फंड होय. इंडेक्स फंड हे गुंतवणुकीचे उत्तम साधन आहे. जास्त जोखीम उचलण्याची तयारी नसेल, तर इंडेक्स फंड एक चांगला पर्याय आहे. एखाद्या निर्देशांकातील समभागात गुंतवणूक करून एकाच निर्देशांकावर भर देण्यात येतो.

समजा एखाद्या कंपनीचा निर्देशांकातील भार 10 टक्के आहे, तर इंडेक्स फंडातही त्या समभागाचा तेवढाच भार राहतो. जो बेंचमार्क आहे, त्या निर्देशांकाची बरोबरी साधणे हा या फंडाचा उद्देश असतो. इंडेक्स फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही हाउस ऑफ फंड्सची अधिकृत वेबसाइट किंवा कोणतेही अॅप वापरू शकता.

सॉवरेन गोल्ड बाँड

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा एकच ऑप्शन सध्या लोकांना माहिती आहे. तो म्हणजे सणासुदीच्या मुहूर्तावर सोने घेणे. गुंतवणुकीवर लोकांना फायदे मिळावेत यासाठी केंद्र सरकारची गोल्ड कमाई योजनेंतर्गत सॉवरेन गोल्ड बाँड योजना सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत लोक त्यांचे पैसे सोन्यात गुंतवू शकतात. गोल्ड बाँड योजना ही गोल्ड कमॉडिटीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे.

या गुंतवणूक मार्गाचा लॉक इन कालावधी 8 वर्षांचा आहे. 8 वर्षांनंतर पैसे काढण्यावर कोणताही भांडवली कर नाही. यामध्ये गुंतवणूकदाराला वार्षिक 2.5% व्याज मिळते. यामध्ये आठ वर्षांत गुंतवलेल्या रकमेवर २०% व्याज मिळू शकते. पैसे काढल्यावर, सोन्याच्या बाजारभावाच्या आधारे पेमेंट केले जाते. यामध्ये तुम्हाला सोन्याच्या वाढच्या किमतीचा फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT