Investment  Sakal
अर्थविश्व

Investment Tips : ज्येष्ठ नागरिकांनी ‘या’ योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळेल जास्त परतावा

सेवानिवृत्तीनंतर, प्रत्येक व्यक्ती आपला निवृत्ती निधी अशा ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करतो ज्यातून त्याला नंतर जास्त परतावा मिळू शकतो.

सकाळ डिजिटल टीम

Schemes for Senior Citizen : सेवानिवृत्तीनंतर, प्रत्येक व्यक्ती आपला निवृत्ती निधी अशा ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न करतो ज्यातून त्याला नंतर जास्त परतावा मिळू शकतो. जर तुम्ही तुमच्या फंडासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल, तर तुमच्यासाठी काही उत्तम योजना आहेत.

Retirement Planning : पोस्ट ऑफिसच्या एमआयएस (MIS) अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही दर महिन्याला निश्चित परतावा मिळवू शकता. या योजनेत एका खात्यात 1,000 ते 4.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक सरकारी योजना आहे. जी खासकरून केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. तुम्ही या योजनेत 60 वर्षांनंतर गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस योजनेत तुम्ही किमान रु 1,000 आणि कमाल रु 15 लाख गुंतवणूक करू शकता.

 Senior Citizens Savings Scheme (SCSS) मध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 7.6 % व्याजदर मिळतो. ही योजना तुम्हाला महागाईमध्ये देखील जास्त परतावा देते. या योजनेत तुम्ही 5 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता.

 रिझर्व बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर सर्व बँका आपले व्याजदर सातत्याने वाढवत आहेत. अनेक बँका ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या बँक एफडीवर (FD) वर 7.50% पर्यंत व्याजदर देत आहेत.

जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेअंतर्गत गुंतवणूक केली तर तुम्हाला दर महिन्याला निश्चित परतावा मिळू शकतो. या योजनेत, तुम्ही एका खात्यात किमान 1,000 रुपये आणि जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये गुंतवू शकता. दुसरीकडे, संयुक्त (Joint Account) खात्यात तुम्हाला 9 लाख रुपयांचा परतावा मिळतो. यामध्ये तुम्हाला 6.6% व्याज मिळेल.

तुम्ही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत गुंतवणूक करून जास्त परतावा मिळवू शकता. 60 वर्षांवरील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात. यामध्ये तुम्ही 1,000 ते 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. यामध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर पेन्शन मिळू शकते. यामध्ये तुम्ही 10 वर्षांसाठी पैसे गुंतवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT