Sula Vineyards IPO Details : वाईन बनवणारी कंपनी सुला वाईन लवकरच त्यांचा आयपीओ घेऊन शेअर बाजारात उतरणार आहे. कंपनीचा हा IPO 12 डिसेंबर 2022 रोजी लाँच केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीओ रुपयाच्या प्राइस बँडवर जारी केला जाईल असे सांगितले जात आहे.
हे ही वाचा : Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!
सुला विनयार्ड्स ही देशातील सर्वात मोठी वाईन कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी भारतीय मद्य उद्योग बाजारातील आघाडीवर असल्याचे म्हटले जाते. या कंपनीकडून द्राक्षांपासून मोठ्या प्रमाणात वाइन तयार केली जाते. देशातील द्राक्ष वाइन व्यवसायातील कंपनीचा बाजार हिस्सा आर्थिक वर्ष 2009 मध्ये 33 टक्के होता. नंतर आर्थिक वर्ष 20 मध्ये 52 टक्क्यांपर्यंत यात वाढ झाली. तर, 2021 मध्ये ही टक्केवारी 52.6 टक्क्यांवर नोंदवली गेली.
सुला विनयार्ड्सचा IPO 12 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी ओपन केला जाणार असून, या IPO मध्ये 14 डिसेंबरपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या IPO मध्ये अँकर गुंतवणूकदारांना 9 डिसेंबर 2022 पर्यंत बोली लावण्याची संधी मिळणार आहे.
किती शेअर्सची होणार विक्री
सुला विनयार्ड्सने जारी केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार, या IPO द्वारे 26,900,530 इक्विटी शेअर्स विकले जाणार आहेत. कंपनी हा IPO पूर्णपणे OFS स्वरूपात आणणार असून, IPO मधून मिळालेले पैसे कंपनीचे शेअर्स विकणाऱ्या गुंतवणूकदारांकडे जाणार आहेत.
काय असणार किंमत
सुला विनयार्ड्सने त्यांच्या IPO साठी 340 ते 357 रुपयांचा प्राइस बँड ठेवला आहे. कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य या IPO मध्ये, 50 टक्के समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIBs) राखीव असतील. याशिवाय 15 टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवले जाणार आहेत. तर, उर्वरित 35 टक्के समभाग किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.