SBI file photo
अर्थविश्व

SBI चे शेअर्स आता खरेदी करणे योग्य की अयोग्य ?

सुमित बागुल

तुमच्याकडे SBI चे शेअर्स असतील किंवा तुम्ही SBI चे शेअर्स खरेदी करण्याच्या विचारात आहात तर ही बातमी नक्की वाचा... एक्सपर्ट्सचे काय म्हणणे आहे जाणून घेऊयात. (is it right time to buy sbi shares or not share market article)

भारतीय स्टेट बँक (SBI) चे शेअर्स 52 आठवड्यांपासून पिकवर जाऊन जरा खाली उतरलेत. त्यामुळे आता एसबीआयच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची योग्य वेळ असल्याचे गुंतवणूकदारांना वाटत आहे. सध्याच्या मार्केटमधील किमतीवर SBI चे शेअर्स खरेदी करता येतील, असे एसएमसी ग्लोबल सिक्युरिटिजचे म्हणणे आहे. याचे शॉर्ट टर्म टारगेट प्राइस 470 रुपये ठेवता येईल आणि टॉप लॉस 390 रुपये ठेवता येऊ शकेल असेही एसएमसी ग्लोबल सिक्युरिटिजचे म्हणणे आहे.

SBI शेअर्समध्ये दिर्घकाळ गुंतवणुकीच्या बाबतीत GCL सिक्युरिटिजचे काय म्हणणे हे ते जाणून घेऊयात. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 6 ते 9 महीन्यांसाठी 500 ते 550 रुपये टारगेटसोबत SBI मध्ये गुंतवणूक करता येऊ शकते.

एसबीआयच्या वार्षिक अहवालात बॅलेन्सशीटमधील रिटर्न रेशो सुधारण्याबरोबरच लवचिकता, लोकं आणि टेक्नोलॉजीवरही लक्ष केंद्रित केले असल्याचे मोतीलाल ओसवाल यांचे म्हणणे आहे. एसबीआय (SBI) डिजिटल बँकांमध्ये आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी गुंतवणूक करत आहे.

एसबीआयने (SBI) मजबूत अंडररायटींग ठेवताना चांगले लोन बुक तयार करण्यावर भर दिला आहे. किरकोळ क्षेत्रातील मजबूत मालमत्तेच्या गुणवत्तेवरून हे स्पष्ट होते. हे प्रामुख्याने सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांना दिल्या जाणाऱ्या असुरक्षित कर्जापैकी 95% कर्ज आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि सरकारला दिल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट कर्जाच्या 41 % मुळे आहे.

गेल्या बुधवारी SBI चा शेअर 433 रुपयांवर बंद झाला. मागच्या एक महिन्यात एसबीआयच्या शेअर्समध्ये 22 टक्के वाढ बघायला मिळाली. याचीच मागच्या वर्षीसोबत तुलना केल्यास यात 56 टक्के वाढ झाल्याचे लक्षात येते.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्यप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT