Budget 2022 Sakal
अर्थविश्व

Budget 2022: यंदा बजेटमध्ये सर्वसामान्यांना 3 गिफ्ट्स मिळण्याचा अंदाज!

शिल्पा गुजर

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात 3 अशा गोष्टींबाबत चांगला निर्णय येऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोणत्या आहेत या तीन गोष्टी पाहुयात...

१. 'वर्क फ्रॉम होम'साठी टॅक्स सूट

कोरोनाच्या काळात एक नवीन ट्रेंड दिसला आहे, तो म्हणजे घरून काम अर्थात वर्क फ्रॉम होम. सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयात घरून काम सुरू झाले. अशा स्थितीत काही कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे पैसे देण्यास सुरुवात केली, पण लोकांना घरून काम करण्यासाठी फर्निचर इत्यादींवरही खर्च करावा लागत आहे. त्यामुळेच घरातून कामाला प्रोत्साहन देण्यासाठी काही घोषणा होऊ शकतात, ज्याचा फायदा केवळ कर्मचाऱ्यांनाच नाही तर कंपनीलाही होईल. कदाचित स्टँडर्ड डिडक्शन वाढवले जाऊ शकते अशी दाट शक्यता आहे. (Union Budget 2022 Live Updates)

२. तीन वर्षांच्या FD वर टॅक्स सूट


इंडियन बँक्स असोसिएशनने करमुक्त एफडीचा लॉक-इन कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. सध्या 5 वर्षांच्या एफडीवर करात सूट मिळते, मात्र आता ती 3 वर्षांपर्यंत कमी करण्याची मागणी होत आहे. एफडीच्या तुलनेत पीपीएफवर चांगला व्याजदर मिळत आहे. यामुळे लोक एफडीमध्ये कमी गुंतवणूक करत आहेत. अनेक लोक म्युच्युअल फंड आणि शेअर्समध्येही गुंतवणूक करत आहेत. लोक 5 वर्षांची एफडी टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. यात 3 वर्षांची एफडीचागी टॅक्स सेव्हर एफडीमध्ये समावेश होऊ शकते.

३. मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वाचवण्यावर सूट

सुकन्या समृद्धी योजनेशिवाय इतर कोणतीही व्यवस्था नाही, जी मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वाचवण्याबाबत आहे. शिवाय सुकन्या समृद्धी योजना ही फक्त मुलींसाठी आहे. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणासाठी बचत करण्यासाठी करप्रणाली असावी, अशीही मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT