Booster STP Sakal
अर्थविश्व

स्मार्ट गुंतवणूक : ‘बुस्टर एसटीपी’तून संपत्तीनिर्माण

आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी तो किंवा ती अशा उपक्रमात सहभागी होतात जिथे पैशांची फारशी चिंता नसते.

सकाळ वृत्तसेवा

आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. त्यासाठी तो किंवा ती अशा उपक्रमात सहभागी होतात जिथे पैशांची फारशी चिंता नसते. मात्र, आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी गुंतवणुकीसाठी सूक्ष्म दृष्टिकोन आवश्यक आहे आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीची मधुर फळे चाखण्यासाठी टिकून राहायला हवे. बहुतांश जणांना हे काम जिकीरीचे वाटते. अशा  गुंतवणूकदारांना हे काम सोपे करणाऱ्या ‘एसआयपी’ आणि ‘बुस्टर एसटीपी’ या योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाने सादर केलेल्या आहेत.  

आता जेव्हा शेअर बाजार सार्वकालीन उच्चांकी पातळीवर व्यवहार करीत असताना एकरकमी गुंतवणूक करणे सोपे नाही. यासाठी एक इष्टतम दृष्टिकोनातून तुमची गुंतवणूक एका विशिष्ट कालावधीसाठी हायब्रिड किंवा डेट फंडांमध्ये करता येईल. यासाठी इक्विटी फंडात ‘एसटीपी’ (सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लॅन) सुरु करता येईल. येथे दर महिन्याला एक ठराविक रक्कम हस्तांतरीत केली जाईल. हस्तांतर रक्कम आणि कालावधी दोन्ही घटक निश्चित केलेले असतील. मात्र, ‘एसटीपी’ करण्याचा याहून अधिक चांगला मार्ग हा ‘बुस्टर एसटीपी’प्रमाणे आहे.

संकल्पना कशी आहे?

‘बुस्टर एसटीपी’ची मुख्य संकल्पना किंवा उद्देश म्हणजे जेव्हा बाजार कोसळतो (किंवा त्याउलट परिस्थिती) तेव्हा गुंतवणूकदाराला जास्तीत जास्त युनिट्स खरेदी करण्यास साह्य करणे, हा आहे. ‘बुस्टर एसटीपी’चे दोन मापदंड आहेत. एक गुंतवणूक रक्कम आणि कालावधी हे नैसर्गिकदृष्ट्या चल आहेत. या वैशिष्ट्यात अगदी छोटी रक्कम ही हप्ता म्हणून गुंतवणूक करता येऊ शकते जेव्हा इक्विटी मूल्यांकन जास्त असते आणि मूल्यांकन जेव्हा कमी असते, त्यावेळी गुंतवणूक जास्त होते.

बाजार मूल्यांकनाबाबत इक्विटी मूल्यांकन निर्देशांकानुसार निर्णय घेतला जातो. हे आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल एएमसीच्या मालकीचे मॉडेल आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर जर एखाद्या गुंतवणूकदाराने दरमहा १०,००० रुपये ‘एसटीपी’ निवडली तर बाजाराच्या परिस्थितीनुसार ‘एसटीपी’ची रक्कम ही १००० रुपयांपासून ५०,००० रुपये  (०.१-५ पट ही मूळ ‘एसटीपी’ रकमेच्या तुलनेत) या दरम्यान असू शकते, जी इक्विटी व्हॅल्युएशन इंडेक्सवर आधारित असेल. लवचिक कालावधीमुळे गुंतवणूक निधी अशा प्रकारे विभागला जातो, की ज्यामुळे बाजारातील संधी सक्षमपणे साधता येतात.

थोडक्यात सांगायचे, तर ‘बुस्टर एसटीपी’चे वैशिष्ट असे, की जे तुमची संपत्ती तयार करू शकते, जिथे एक फंड व्यवस्थापक तुमच्या निधीचे योग्य प्रकारे वाटप करतो. ते त्यांचे काम सर्वोत्तमपणे करतात.

- जयदीप दोशी

(लेखक प्रोइन्व्हेस्ट वेल्थ मॅनेजर्स प्रा. लि.चे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT