kalamandir IPO sakal
अर्थविश्व

Kalamandir IPO : लवकरच साई सिल्क्सचा आयपीओ, सेबीकडून मंजूरी

शेअर बाजारात आपले शेअर्स लिस्ट करण्यासाठी साई सिल्क आयपीओ आणत आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेअर बाजारात लवकरच आणखी एक आयपीओ येणार आहे. सेबीने साई सिल्कच्या आयपीओला मान्यता दिली आहे. कंपनीने 1200 कोटी रुपये उभारण्यासाठी जुलैमध्ये सेबीकडे कागदपत्रे दाखल केली होती, त्यानंतर सेबीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

शेअर बाजारात आपले शेअर्स लिस्ट करण्यासाठी साई सिल्क आयपीओ आणत आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनी आयपीओद्वारे 600 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करणार आहे आणि 18,048,440 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी केले जातील. (kalamandir sai silk ipo coming soon in share market )

ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीचे प्रमोटर त्यांचे स्टेक कमी करतील आणि 18,048,440 शेअर्स विकतील. सेबीकडे जमा केलेल्या डीआरएचपीनुसार, कंपनीचे प्रमोटर त्यांचे स्टेक कमी करणार आहेत आणि फक्त आयपीओद्वारे त्यांच्या शेअर्सची विक्री करणार आहेत.

आयपीओद्वारे जी रक्कम उभी केली जाईल, ती 25 नवीन स्टोअर्स, 2 नवीन वेअरहाऊस उघडण्यासाठी वापरली जाईल. याशिवाय भांडवलाची गरज पूर्ण करणे, कर्ज कमी करण्यासाठी हे पैसे वापरले जातील.

आयपीओसाठी मोतीलाल ओसवाल, एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक बुक रनिंग लीड मॅनेजर असणार आहेत. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये कंपनीची 50 स्टोअर्स आहेत. या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट केले जातील.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT