Nerolac Paints  sakal
अर्थविश्व

Nerolac Paints : पेंट कंपनीने गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये भरला श्रीमंतीचा रंग

बीएसईवर कंसाईचे शेअर्स गुरुवारी 444.10 रुपयांवर बंद झाले होते. त्याची मार्केट कॅप 23,933.42 कोटी रुपये आहे.

सकाळ डिजिटल टीम

पेंट सेक्टरमधील नावाजलेली कंपनी कंसाई नेरोलॅक पेंट्सने (Kansai Nerolac Paints) गुंतवणूकदारांना लाँग टर्ममध्ये कोट्यधीश करोडपती बनवले आहे. पण त्याचवेळी सध्या हे शेअर्स कमजोर दिसत आहेत.

यावर्षी ते 25 टक्क्यांहून अधिक कमकुवत झाले आहे, पण  येत्या काळात हे शेअर्स 520 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, जे सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 17 टक्के जास्त असल्याचे बाजार तज्ञांच्या म्हणणे आहे. बीएसईवर कंसाईचे शेअर्स गुरुवारी 444.10 रुपयांवर बंद झाले होते. त्याची मार्केट कॅप 23,933.42 कोटी रुपये आहे.

20 वर्षात कोट्यधीश

8 नोव्हेंबर 2002 रोजी कंसाई नेरोलॅक पेंट्सचे शेअर्स अवघ्या 4.02 रुपयांना मिळत होते, यानंतर, 20 वर्षांमध्ये ते 444.10 रुपयांवर पोहोचले अर्थात जवळपास 110 पटीने वाढ यात दिसून आली.  याचा अर्थ कंसाई नेरोलॅक पेंट्समध्ये त्यावेळी गुंतवलेले 1 लाख रुपये आता 1.10 कोटी रुपये झाले असते.

गेल्या वर्षी 17 नोव्हेंबर 2021 रोजी त्याचे शेअर्स 629.65 रुपयांवर होते, जे एका वर्षातील विक्रमी उच्चांक आहे. यानंतर, प्रॉफीट बुकींगमुळे यात 43 टक्के घसरण झाली आणि 22 जून 2022 रोजी 358.05 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांकावर घसरला. पण आता यामध्ये खरेदी वाढली आणि आत्तापर्यंत 24 टक्के वसुली झाली असली तरी ती एका वर्षाच्या विक्रमी उच्चांकावरून 30 टक्क्यांच्या सवलतीवर आहे.

जुलै-सप्टेंबर 2022 मध्येकंसाई नेरोलॅक पेंट्सचा स्टँडअलोन रेव्हेन्यू वार्षिक 19 टक्क्यांनी वाढून 1810 कोटींवर पोहोचला आहे. कंपनीचा नफाही अपेक्षेपेक्षा थोडा कमी झाला. कंपनी आपला ब्रँड तयार करण्यासाठी अधिक खर्च करत आहे. त्याचा परिणाम कंपनीच्या आर्थिक आरोग्यावर दिसून येतो. तरीही, देशांतर्गत ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने यात 520 रुपयांचे टारगेट दिले आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT