UPI किंवा मोबाईल बँकिंगच्या मदतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यातून दूसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करु शकता. मात्र बऱ्याचदा काही जण घाईत चुकीच्या दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. फक्त ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन देखील लोकांकडून ही चूक होते.
आजकालच्या काळात बँक अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अनेक डिजीटल मध्यमे उपलब्ध आहेत. ज्यांच्या मदतीने अगदी काही क्षणांमध्येच तुम्ही हव्या त्या खात्यात पैसे पाठवू शकता. UPI किंवा मोबाईल बँकिंगच्या (Mobile Banking) मदतीने तुम्ही तुमच्या बँक खात्यातून दूसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करु शकता. मात्र बऱ्याचदा काही जण घाईत चुकीच्या दुसऱ्याच खात्यात पैसे ट्रान्सफर करतात. फक्त ऑनलाईनच नाही तर ऑफलाईन देखील लोकांकडून ही चूक होते. (know process how to reverse money transferred to wrong account)
जेव्हा तुम्ही चूकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करता तेव्हा काय करावे? तर सर्वात आधी ज्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पैसे पाठवायचे आहेत त्यांच्याशी बोलून पैसे पोहचले की नाहीत याची खात्री करुन घ्या, जर त्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पोहचले असतील तर ट्रान्जेक्शन बरोबर झाले आहे आणि पैसे पोहचले नसतील तर मात्र तुम्ही योग्य खात्यात पैसे टाकले आहेत का ते चेक करावे लागेल.
जर तुम्ही चुकून पैसे एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या खात्यात टाकले असतील तर याची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात बँकेला कळवा. बँकेला या ट्राजेक्शनबद्दल सविस्तर माहिती द्या. यामध्ये ट्रान्जेक्शनची तारीख, वेळ आणि आपला अकाऊंटनंबर तसेच ज्या अकाऊंटमध्ये पैसे चुकून ट्रांन्सफर झाले आहेत त्याचा नंबर देखील द्या.
बऱ्याचदा असे होते की, तुम्ही चुकीचा अकाऊंट नंबर किंवा IFSC कोड दिल्याने ट्रांन्सफर केलेली रक्कम आपोआपच तुमच्या बँक खात्यात परत येते, या प्रोसेससाठी थोडासा वेळ लागू शकतो. जर पैसे परत आले नाहीत तर अशावेळी बँकेत जाऊन बँक मॅनेजर यांना भेटा. तुमचे पैसे कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्सफर झाले आहेत याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. जर हे ट्रान्जेक्शन तुमच्याच बँकेच्या एखाद्या शाखेत झालं असेल तर अगदी सहजपणे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील.
जर पैसे एखाद्या दुसऱ्या बँकेच्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील तर पैसे परत मिळवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. बऱ्याच प्रकरणांमध्ये तर बँक तब्बल दोन महिन्यांपर्यंतचा वेळ घेते. तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन पैसे कोणत्या शहरातील कोणत्या बँकेतील खात्यात ट्रान्सफर झाले आहेत याची माहिती मिळवू शकता आणि त्या बँकेशी संपर्क करुन देखील तुम्ही तुमची रक्कम परत मिळवण्यासाठी प्रयत्न करु शकता.
जर तुम्ही तुमच्या बँक खात्यातून अन्य कोणत्या खात्यात रक्कम ट्रान्सफर करत असाल तेव्हा आपल्याला एक मॅसेज पाठवला जातो. त्यामध्ये जर हे ट्रांजे्क्शन चूकीचे असेल तर कृपया हा मॅसेज या नंबरवर पाठवा. असा मॅसेज देखील तुम्ही पाठवू शकता. तसेच RBI कडून देखील सर्व बँकाना निर्देश देण्यात आले आहेत की, जर चुकून एखाद्याकडून रक्कम इतर खात्यात जमा झाली असेल तर बँकेला त्यावर लवकरात लवकर कारवाई करावी लागेल. तसेच तुमचे ते पैसे योग्य खात्यात परत पाठवण्याची जबाबदारी बँकेवर टाकण्यात आलेली आहे त्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही.
(know process how to reverse money transferred to wrong account)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.