Dogecoin Google
अर्थविश्व

Dogecoin नेमकं आहे काय? ज्यामध्ये गुंतवणुकीतून लोक होतायत मालामाल

Dogecoinची सुरुवात सुमारे एक वर्षापूर्वी जोक करंसी म्हणून झाली होती.

रोहित कणसे

सध्या इंटरनेटच्या जगात काहीही होऊ शकतं. विनोद म्हणून सुरू झालेली एखादी गोष्ट जगभरातील गुंतणूकदारांना भुरळ पाडू शकते. असाच काहीसा प्रकार मागच्या काही दिवसांत Dogecoin बदद्ल पाहायला मिळाला. आज नेमकं हे डॉजकॉईन (Dogecoin) आहे तरी काय याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

Dogecoin म्हणजे काय?

सॉफ्टवेअर इंजिनीअर बिली मार्कस आणि जॅक्सन पामर यांनी 2013 मध्ये Dogecoinची एक जोक म्हणून सुरुवात केली होती. ही एक ओपन सोर्स डिजीटल चलन आहे. Dogecoin (DOGE) लोकप्रिय "डोगे" इंटरनेट मीम वर आधारीत आहे, आणि याच्या लोगोवर एक शीबा इनू या जातीच्या कुत्र्याचा फोटो आहे. डॉजकॉईनच्या निर्मात्यांनी हे निव्वळ मजा म्हणून सुरू केले होते. कुत्रा असलेल्या एका मजेशीर मीमवर ते आधारीत होते. लोकांनी फक्त मजेसाठी ही करंसी वापरावी यासाठी तयार केली होती. जरी Dogecoin ची जोक म्हणून सुरुवात झाली परंतु सोशल मीडिया आणि मीम्सच्या जोरावर आज ती जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टोकरन्सींपैकी एक बनली आहे . टेस्ला आणि स्पेसएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलोन मस्क यांच्या ट्विटनंतर त्याच्या किंमती जोरात वाढल्या होत्या आणि उतरल्याही होत्या.

तर Dogecoin ही एक क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) आहे. याची सुरुवात सुमारे एक वर्षापूर्वी जोक म्हणून झाली होती. मागील आठवड्यात हे चलन एका नवीन शिखरावर पोहोचले. आता त्याची मार्केट कॅप वाढून 9200 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स (सुमारे 6.90 लाख कोटी रुपये) झाली आहे. या चलनाने गेल्या सहा महिन्यांत 26000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. डिजिटल किंवा क्रिप्टो चलन हे इंटरनेटवर चालणारे व्हर्च्युअल चलन आहे.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलन. याचे व्यवहार ऑनलाईन होत असतात. ही चलनपद्धती नगदी चलनाला पर्याय असणारी एक डिजीटल किंवा व्हर्च्युअल करन्सी आहे. जी वापरण्यासाठी इंटरनेटची गरज पडते. या चलनाची साठवणूक करणेही धोकादायक ठरू शकते कारण यावर कोणत्याही सरकारचे किंवा बँकेचे नियंत्रण नसते. यामधील बिटकॉइन हे प्रसिद्ध अभासी चलन आहे. व्यतिरिक्त जगात रेड कॉईन, सिया कॉइन, सिस्कोकोईन, व्हॉईस कॉईन आणि मनरो यासारख्या शेकडो अभासी चलने आहेत. बिटकॉईन नंतर आलेल्या या सर्व चलनांना ऑल्ट कॉईन (Alt Coin) असे म्हणतात.

सर्वोच्च परतावा दिला-

गेल्या सहा महिन्यांत अमेरिकन शेअर बाजाराचा अग्रणी मानांकन असलेल्या 'एस अँड पी' ने 19 टक्के परतावा दिला आहे. तर, बिटकॉइनने 286 टक्के परतावा दिला आहे. इलॉन मस्क यांची प्रसिध्द कार कंपनी टेस्लाच्या समभागात 56 टक्के परतावा मिळाला. त्याच वेळी, Dogecoin ने या कालावधीत 26 हजार टक्के इतका आफाट परतावा दिला आहे. सध्या जगभरातील अभासी चलन होल्डर Dogecoin मध्येही इंटरेस्ट दाखवताना दिसत आहेत.

बिटकॉइन (Bitcoin) आणि डॉजकॉईन (Dogecoin)

सीएनबीसीच्या अहवालानुसार, बर्‍याच वर्षांपूर्वी जेव्हा Dogecoin बनवले गेले तेव्हा त्यासाठी तोच कोड वापरण्यात आला होता जो बिटकॉइन बनवण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये वापरला होता. Dogecoin हे इन्फेलशनरी चलन आहे, याचा अर्थ असा आहे की, दररोज प्रत्येक मिनिटाला कोट्यावधी Dogecoin तयार केले जाऊ शकतात ते तयार करण्यास मर्यादा नाही. बिटकॉईनच्या बाबतीत मात्र तसे नाही. उदाहरणार्थ, दररोज प्रत्येक मिनिटाला 10 हजार अधिक Dogecoin छापले तर ते दररोज सुमारे 15 मिलीयन doge किंवा प्रति वर्ष 5 अब्ज Doge इतके असते.

Dogecoin चा वापर कशासाठी होतो?

Dogecoin हे रेडिट आणि ट्विटर वप टिपिंग सिस्टमसाठी केला जाते. एखाद्याला चांगल्या कामाचे बक्षीस म्हणून हे कॉईन दिले जातात. डिजीटल चलन वापरणाऱ्या लोकांमध्ये डॉजकॉइनचा वापर केला जातो. तुम्ही डॉजकॉईन नल ही एक वेबसाईट आहे ज्यावर तुम्हाला सुरुवातीला काही Dogecoin फ्री दिले जातात. जेणेकरुन तुम्ही Dogecoin कम्युनिटीमध्ये जॉईन होऊ शकता.

आता पुढे काय?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मीम कल्चरमुळे Dogecoin ची किंमत वाढली आहे. हे नंतर किती टिकेल? पाहावे लागेल कारण त्यात कोणतीही वास्तविक प्रणाली नाही. जर आपण असे काहीतरी करण्यास सक्षम असाल तर त्यात भरभराट देखील होऊ शकते. एलोन मस्क म्हणतात की क्रिप्टोकरर्न्सी कदाचित चांगले उत्पन्न देत असेल परंतु गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगली पाहिजे. Dogecoin च्या समर्थनार्थ एलोन मस्कने फेब्रुवारीमध्ये अनेक ट्विट केले. मस्कच्या ट्वीटपूर्वी ते 3 सेंटवर ट्रेड करत होते. मस्कच्या ट्विटमुळे Dogecoin ची किंमत वाढण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी 20 डिसेंबर रोजी त्यांने एक शब्द ट्विट केला होताः doge आणि त्याची किंमत 20 टक्क्यांनी वाढली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT