एलआयसी हाऊसिंग फायनान्सने इंडिया पोस्ट पेमेंट बँक सोबत गृहकर्ज व्यवसाय वाढवण्यासाठी करार केला आहे.
- शिल्पा गुजर
इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एलआयसी हाऊसिंग फायनान्स बँक लिमिटेड यांच्यात झालेल्या कराराअंतर्गत सुमारे 4.5 कोटी ग्राहकांना आयपीपीबीच्या (IPPB) 1.36 लाख ऍक्सेस बँकिंग पॉइंटवर गृहकर्जाची सुविधा मिळेल.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सने (LIC Housing Finance) इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) सोबत गृहकर्ज व्यवसाय वाढवण्यासाठी करार केला आहे. या करारानंतर, पोस्ट ऑफिस बँकेचे 4.5 कोटी ग्राहक आता एलआयसी हाऊसिंग फायनान्सला उपलब्ध होतील, ज्यामुळे कंपनीला नवीन बाजारपेठ आणि गृहकर्जांसाठी नवीन ग्राहक मिळतील.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या देशभरात 650 शाखा आणि 1.36 लाख बँकिंग टच पॉईंट्स आहेत. इंडिया पोस्टच्या नेटवर्क अंतर्गत 2 लाखांहून अधिक पोस्टमन आणि ग्राम डाक सेवक आहेत. या लोकांकडे आता मायक्रो एटीएम, बायोमेट्रिक उपकरणांसारख्या सुविधा आहेत. इंडिया पोस्टने बँकिंग सेवेवरही खूप भर दिला आहे. LICHFL सोबत करार झाल्यानंतर, इंडिया पोस्टचे कर्मचारी त्याच्यासाठी व्यवसाय आणण्याचे काम करतील.
इंडिया पोस्ट ग्राहकांना मिळणार गृहकर्जाची सुविधा
LIC हाऊसिंग फायनान्ससोबतची टाय-अप इंडिया पोस्टच्या प्रवासासाठी एक मोठे यश असल्याचे आयपीपीबीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जे. वेंकटरमू म्हणाले. आता आमच्या ग्राहकांना गृहकर्जाची सुविधाही मिळेल. आमच्या ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. याशिवाय आमचे लक्ष डिजिटल बँकिंगवर असल्याचेही ते म्हणाले.
एलआयसी हाऊसिंग फायनान्सला मिळणार नवी बाजारपेठ
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेबरोबर भागीदारीच्या मदतीने आम्ही स्वतःसाठी नवी बाजारपेठ शोधू असे एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वाय विश्वनाथ गौर यांनी म्हटले. त्यामुळे आमचा विस्तार वाढेल आणि नवीन ग्राहक आमच्यासोबत येतील असेही ते म्हणाले. इंडिया पोस्ट देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात उपलब्ध आहे. त्यामुळेच पोस्ट ऑफिस नेटवर्कशी करार करणे हे आमच्यासाठी एक मोठे यश असल्याचेही ते म्हणाले.
6.66 टक्के दराने गृहकर्ज मिळणार
एलआयसी हाऊसिंग फायनान्स सध्या 6.66 टक्के दराने गृह कर्ज देत आहे. मात्र, हा व्याजदर 50 लाखांपर्यंतच्या गृहकर्जासाठी आहे. जर कोणी पगारदार असेल आणि त्याचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला असेल तर या व्याजदराने 50 लाखांपर्यंतची गृहकर्ज सहज उपलब्ध होतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.