अर्थविश्व

Fortune Global 500 List : अंबांनींच्या कंपनीला मागे टाकतं LIC ची आघाडी

Fortune Global 500 च्या यादीत यंदाच्यावेळी भारतातील 9 कंपन्यांना स्थान मिळाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fortune Global 500 List : शेअर बाजारात अलीकडेच सूचीबद्ध झालेल्या सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या नावावर आणखी एक विक्रम जमा झाला आहे. जरी LIC ची शेअर बाजारात आतापर्यंतची कामगिरी विशेष राहिली नसली तरी, फॉर्च्युन ग्लोबल 500 च्या यादीत इतर सर्व भारतीय कंपन्यांना मागे टाकले आहे. विशेष म्हणजे भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजही एलआयसीपेक्षा खूप मागे आहे.

एलआयसीला प्रथमच मिळाले स्थान

LIC ला प्रथमच Fortune Global 500 च्या नवीनतम यादीत स्थान मिळाले असून, यंदाच्यावेळी भारतातील 9 कंपन्यांना या यादीत स्थान मिळाले आहे. यातील 5 कंपन्या सरकारी आहेत, तर उर्वरित 4 कंपन्या खाजगी क्षेत्रातील आहेत. महसुलाच्या आधारे तयार करण्यात आलेल्या या यादीत LIC 98 व्या क्रमांकावर आहे. सुमारे 97.27 अब्ज डॉलर कमाई आणि 553.8 दशलक्ष डॉलर नफ्यासह कंपनी भारतात प्रथम क्रमांकावर आहे.

यादीत टाटा समूहाच्या 2 कंपन्या

रिलायन्स इंडस्ट्रीज फॉर्च्युन ग्लोबल 500 यादीत भारतातून दुसऱ्या स्थानावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज गेली 19 वर्षे सातत्याने या यादीचा भाग आहे. जागतिक स्तरावर रिलायन्स 93.98 अब्ज डॉलर महसूल आणि 8.15 अब्ज डॉलर निव्वळ नफ्यासह 104 व्या क्रमांकावर आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 51 स्थानांनी सुधारणा झाली आहे. LIC आणि रिलायन्स इंडस्ट्रीज व्यतिरिक्त, या यादीत स्थान मिळविलेल्या भारतीय कंपन्यांमध्ये SBI हे बँकिंग क्षेत्रातील एकमेव नाव आहे. त्याचबरोबर टाटा समूहाच्या टाटा मोटर्स आणि टाटा स्टील या दोन कंपन्यांनाही या यादीत स्थान मिळाले आहे.

भारतातील या सरकारी कंपन्यांना मिळाले स्थान

भारतातून या यादीत स्थान मिळविलेल्या कंपन्यांमध्ये सरकारी मालकीची तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल 142 व्या स्थानावर आहे. कंपनीच्या क्रमवारीत एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 28 स्थानांनी सुधारणा झाली आहे. दुसरीकडे, आणखी एक सरकारी मालकीची कंपनी ओएनजीसीने 16 स्थानांनी झेप घेत 190 वा क्रमांक मिळवला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बीपीसीएलला 295 वे स्थान मिळाले आहे. बीपीसीएलच्या क्रमवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 19 स्थानांची सुधारणा झाली आहे. SBI 17 स्थानांनी झेप घेत 236 व्या क्रमांकावर आहे.

शीर्ष स्थानांवर अमेरिकन कंपन्या

या यादीत समाविष्ट असलेल्या खाजगी कंपन्यांवर नजर टाकली तर रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय टाटा समूहाच्या टाटा मोटर्सला 370 वे स्थान मिळाले आहे. त्याचप्रमाणे टाटा स्टीलने 435 वे स्थान मिळवले आहे. राजेश एक्स्पोर्ट्स 437 व्या क्रमांकावर आहे. या यादीतील टॉप 5 कंपन्यांमध्ये 2 कंपन्या अमेरिकेतील आहेत, तर चीनमधील 3 कंपन्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. अमेरिकन रिटेलर कंपनी वॉलमार्टने सलग 9व्या वर्षी या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. जेफ बेझोस यांची कंपनी अॅमेझॉनला दुसरे स्थान मिळाले आहे. हे अॅमेझॉनचे आतापर्यंतचे सर्वोत्तम रेटिंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT