LIC IPO sakal media
अर्थविश्व

LIC IPO ची लॉन्च तारीख पक्की; जाणून घेऊया सविस्तर माहिती

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीच्या इनिशियल पब्लिक ऑफरची (IPO) तारीख निश्चित झाली आहे.

शिल्पा गुजर

LIC IPO: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन अर्थात एलआयसीच्या इनिशियल पब्लिक ऑफरची (IPO) तारीख निश्चित झाली आहे. पण एलआयसी आयपीओची साईज 40 टक्क्यांपर्यंत कमी केली जाऊ शकतो असेही समजत आहे. सरकार यापूर्वी एलआयसीच्या आयपीओमधून 60,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत होते. मात्र, आता ते फक्त 21,000 कोटी रुपयांचा आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय, 9,000 कोटी रुपयांचा ग्रीन शू पर्याय लॉन्च केला जाईल, जो IPO चा एकूण आकार 30,000 कोटी रुपयांपर्यंत नेऊ शकतो.

ग्रीन शू पर्याय नेमका काय ?

शेअर्सच्या अतिरिक्त अलॉटमेंटसाठी ग्रीन शू एक पर्याय आहे. जर कंपनीच्या IPO ला त्याच्या आकारापेक्षा जास्त सबस्क्रिप्शन मिळाले तर ती ग्रीन शू पर्यायाद्वारे अतिरिक्त शेअर्सचे वाटप करू शकते. यामुळे कंपनीला बाजारातील मागणी आणि परिस्थितीनुसार त्याचा IPO आकार बदलता येतो. उदाहरणार्थ, जर LIC च्या प्रस्तावित ऑफरचा आकार 21,000 कोटी रुपये निश्चित केला असेल आणि पण गुंतवणूकदारांकडून 28,000 कोटी रुपयांच्या बोली मिळाल्या असतील, तर ती ग्रीन शू पर्याय अंतर्गत अतिरिक्त 7,000 कोटी शेअर्सचे वाटप करून सब्सक्रिप्शन कायम ठेवू शकते. एलआयसी 9,000 कोटी रुपयांचा ग्रीन शू पर्याय आणण्याच्या तयारीत आहे. (Life Insurance Corporation i.e. LIC's Initial Public Offer (IPO) date has been fixed.)

एलआयसीचे मूल्यांकनात (Valuation) घट-

सरकारने एलआयसीचे मूल्यांकनही 6 लाख कोटी रुपयांपर्यंत कमी केले आहे. हे त्याच्या एम्बेडेड व्हॅल्यूच्या (5.39 लाख कोटी) फक्त 1.1 पट आहे. फेब्रुवारीमध्ये आयपीओसाठी सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये एलआयसीचे मूल्यांकन सुमारे 12 लाख कोटी रुपये ठेवण्यात आले होते. पण, आता सरकार 6 लाख कोटी रुपयांच्या मुल्यांकनात सुमारे 5 टक्के हिस्सेदारी विकून 30,000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. एलआयसीच्या मूल्यांकनात लक्षणीय घट झाल्याने त्याचा IPO यशस्वी होईल असे एका इन्व्हेस्टमेंट बँकरने सांगितले. IPO मध्ये गुंतवणूक करणार्‍या गुंतवणूकदारांना लिस्टिंगचा लाभ मिळावा आणि लिस्ट झाल्यानंतरही त्यांचे शेअर्स खरेदी करण्यात त्यांना रस असावा अशी सरकारची इच्छा आहे.

आयपीओची तारीख-

एलआयसीचा आयपीओ 2 मे रोजी लॉन्च केला जाऊ शकतो असे न्यूजपेपर बिझनेस स्टँडर्डने एलआयसीच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. सरकारने फेब्रुवारीमध्ये एलआयसीच्या आयपीओसाठी ड्राफ्ट पेपर सादर केला होता. LIC चा IPO आणण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ आहे. जर तो या तारखेपर्यंत आयपीओ आणू शकला नाही, तर त्याला आयपीओच्या मंजुरीसाठी पुन्हा सेबीकडे कागदपत्रे सादर करावी लागतील. यासह, त्याला एलआयसीचे डिसेंबर तिमाही निकाल आणि कंपनीचे नवीन एम्बेडेड मूल्य (Embedded Value) अपडेट करावे लागेल. ड्राफ्ट पेपरनुसार, LIC ची एम्बेडेड व्हॅल्यू सध्या 5.39 लाख कोटी रुपये आहे.

IPO चा साईज का कमी केला जात आहे?

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दररोज बदलणाऱ्या परिस्थितीमुळे शेअर बाजारात सध्या अस्थिरता आहे. याशिवाय यूएस फेडरल रिझव्‍‌र्ह बँकेने वाढवलेले व्याजदर, आर्थिक धोरण कडक करणे आणि परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री यामुळेही बाजारातील अस्थिरता वाढली आहे. बाजारातील सध्याची अस्थिरता पाहता सरकारला 60,000 कोटी रुपये उभारणे कठीण जाऊ शकते, असे अनेक तज्ज्ञांनी सांगितले.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT